पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९२. ४११ हे प्रभो, शापादिकांचा प्रभाव मनावर होत नाही, असे जें वरील आख्यायिकेंत भानूने व आपण ठरविलेत ते कसें ! ब्रह्मदेव-बा मुने, प्राण्यास शुद्ध व शुभकर्मयुक्त पौरुषाने प्राप्त करून घेता येत नाही, असें या जगात काही नाही. आब्रह्मस्तंभपर्यंत जेवढे प्राणी आहेत ते सर्व द्विशरीरी आहेत. त्यांतील मन हे एक शरीर आहे व दुसरें मासमय. पण पहिलें शरीर आपलें कार्य सत्वर करणारे व अतिशय चल आहे आणि दुसरे काही न करणारे व जड आहे. स्थूल शरीर साकार असल्यामुळे त्याचा जगांतील इतर पदा- र्थाशी संबंध होतो व त्यामुळे त्याच्यावरच शाप, शस्त्रे, विष, मत्र इत्यादि. काचा परिणाम होतो. हा मांसाचा स्थूल गोळा मुक्यासारखा, अशक्त, दीन व क्षणभंगुर आहे. तो दैव, पिता, गुरु, राजा इत्यादिकांच्या अधीन असतो. परंतु मनाची स्थिति याहून अगदी निराळी आहे. प्राण्याचा तो मनःसंज्ञक देह त्याच्या अधीन असल्यासारखा भासतो हे खरे; पण तो त्याच्या अधीन मुळीच नसतो. तर उलट तो स्वतंत्र असतो. कारण स्वपौरुषाचा आश्रय करून व शाश्वत धैर्य धरून जर तो राहिला तर दुःखाकात होत नाही व दुःखाची कारणेही त्यास दूपित करीत नाहीत. देहवान् प्राण्याचा हा मनोदेह जसा जसा प्रयत्न करीतो तसा तसा तो आपल्या निश्चयानुरूप फळ भोगितो. मास- देहामध्ये हे सामथ्र्य नसते. तो मात्र खरोखरच परतंत्र असतो. त्याला स्वतः कांही करितां येत नाही. यास्तव शापादिकाची फळें त्यास भोगावी लागतात. मनोदेहाचे सर्व चेष्टित सफल होत असल्यामुळेच तें सर्वदा पवित्र अनुसंधान करिते व त्याच्या ठिकाणी शापादि निष्फळ होतात. सर्व दुर्व- मचे काळ. सबलाच्या वाटेस कोणीही जात नाही. स्थूल शरीर जलात बुडो, अनीत जळो, की चिखलात रुतो. मन ज्याचें अनुसंधान करिते सेंच त्याला तत्काल प्राप्त होते. देहादि इतर सर्व भावाचा नाश'जरी झाला तरी शुभाशुभ प्रयत्न अनुरूप फळ दिल्यावाचून रहात 'नाही' 'प्रयत्नाच्या सामथ्याने आपल्या चित्तास अहल्यामय करून कृत्रिम इदाने कष्ट कसे सहन केले ते तू ऐकलेंसच आहेस. फार काय पण त्याला त्या. प्रियाप्रेमापुढे शारीरिक दुःखाचे भानही झाले नाही. दुष्कृत्या दूषित झालेल्या मनाची दृढताही जर आपला एवढा प्रभाव दाखविते तर शुभ संकल्पाचा प्रभाव