पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० बृहद्योगवासिष्ठसार. रचली. तात्पर्य मनाचा असा अद्भुत प्रभाव आहे. चित्त जे जे चिंतन करिते तें तें सफल होतें. इदुपुत्र सामान्य ब्राह्मण होते पण मनाच्या निग्रहाने ते हिरण्यगर्भ झाले. त्याच्याप्रमाणेच आमीही सर्व चित्तसपन्न आहो. तेव्हां अनुकूल कामना, कर्म व वासना याच्या सहायाने प्रयत्न केल्यास आझीही हिरण्यगर्भ होऊ. सर्व मनाच्या अधीन आहे. सूक्ष्म वासनायुक्त चित्तच जीव असून स्थूलवासनामय चित्त देह आहे पण चित्तामुळे अनुभवास येणारे हे देहचमत्कार शात झाले की, या सर्वांचे आधारभूत चैतन्य ब्रह्म होते. अर्थात् देह ही चिचाहून भिन्न वस्तु नाही व चित चैतन्याइन निराळे नाही. चित्त जशी भावना करितें तसा पुरुष होतो. चित्ताने मी जीव आहे, असें सटल्यास तो जीव होतो; मी देव आहे, असें झटल्यास तो देव होतो; व पाषाण आहे अशी दृढभावना केल्यास तो पाषाण होतो. तस्मात् वस्तुतः देह नाही, अहकार नाही, ससार नाहीं, जाति-गुणादिही नाहीत. तर जे काही आहे ते सर्व विज्ञान, मानद, ब्रह्म आहे, असें जाणून तूं निरिच्छ होऊन रहा ९१. सर्ग ९२-या सर्मात पुरुषयत्न करिता यावा मधून मनाच्या अमोघ शक्तीने वर्णन करितात. श्रीवसिष्ठ- रघुवंशजा, त्या ब्रह्मदेवास मी पुन: असे झटले-भगवन् , शाप, मत्र इत्यादिकांच्या शक्ति अमोघ आहेत असे आपण सांगितलें आहे. तेव्हां आता पुनरपि त्या निष्फळ आहेत, असे कसे म्हणता ? शाप व मत्र यांच्या वीर्याने प्राण्यांचे मन, बुद्धि, इदिये इत्यादिकाचा नाश होतो, असे आम्ही पुष्कळदा पाहिलें व ऐकलेंही आहे. (नहुष, सौदास, धृतराष्ट्र यांस शापामुळे क्रमाने मोह, बुद्धिनाश, व चक्षु- रिदियाभाव ही फळे भोगावी लागली, हे प्रसिद्ध आहे.) मन व देह याचें वायु व स्पंद किंवा तिळ व त्यातील तेल याप्रमाणे ऐक्य असते, भसा सामान्यतः अनुभव येतो. अथवा देह नाहीच. केवळ मनानेच प्राणी शापादिकाचे फल स्वमाप्रमाणे भोगितो, असे समजणे अधिक युक्त आहे. तस्मात देह किंवा मन यातील एकाचा नाश झाला असता दोघाचाही नाश होतो, असे समजणे प्रशस्त दिसते. निदान मनाचा नाश झाला असतां देहाचा क्षय होणे तरी अति अवश्य आहे. यास्तव