पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ९१. नव्हते, असे नाही. तात्पर्य, प्रेम ही एक अशी वस्तु आहे की, तिच्या योगाने विद्ध झालेला प्राणी हवी ती ऐहिक हानि सहन करण्यास तयार होतो ९.. सर्ग ९१-त्या भानूसच मनु करून त्या ब्रह्मदेवाने आपला सर्ग रचिला व तो ___ मनोमात्र होता, असे येथे वर्णन करितात. भानु-यास्तव, हे प्रभो, या कथेवरून आपणास एवढेच घ्यावयाचे की, मनाचा निग्रह भयकर शापानींहो करितां येत नाही आणि त्यामुळेच या ऐंदवाच्या सर्गाचा नाश होणे अशक्य आहे. शिवाय दुस यांच्या कार्याचा नाश करण्यास उद्युक्त होणे, हे महात्म्यास शोभत नाही. मापल्या पौरुषाने जर आपला उत्कर्ष करून घेतला तर त्यांत इतरांची कोणती हानि आहे व त्यामुळे त्यानीं दीन को व्हावें ? परमात्म्याने प्रत्येक प्राण्यास ज्याचा त्याचा प्रयत्न हा मोठा थोरला चिंतामणि देऊन ठेविला आहे. त्यास जे उपयोगात आणितात त्याच्यावर " अरे, या अमक्याचे कल्याण झाले. आता मी काय करू? " असें ह्मणून खेद करण्याचा प्रसंग येत नाही. मन हेच सर्व बन्यवाईट कार्याचे कारण आहे. प्रा- ण्याच्या मानसिक निश्चयाचा घात कोणीही करू शकत नाही. यास्तव हे ऐदवांचे सर्ग या आकाशात खुशाल असू देत. तूही आपली निराळी सुष्टि निर्माण कर. कारण बुद्धयाकाश अनत आहे. ते असल्या अनत सृष्टींनीही भरणार नाही. चित्ताकाश, चिदाकाश व तिसरे हे भूताकाशही अनंत आहे. यास्तव हे प्रभो, तू एक, दोन, चार, दहा किंवा जितकी हवी असतील तितकी ब्रह्मांडें रच. श्रीवसिष्ठ -राघवा, भानूचे ते योग्य व ग्राह्य भाषण ऐकून ब्रह्मा मणाला- भानो, तूं चांगली गोष्ट मागितलीस. आकाश अनंत अस- त्यामुळे व मनही विलक्षण शक्तियुक्त असल्यामुळे मला माझा इष्ट सर्ग करिता येईल. माझें तें नित्य कर्म असल्या कारणानेच मला या व्यवहारात पडावे लागत आहे. असो, तर, हे भानो, तूंच आतां माझा प्रथम मनु हो व माझ्या आज्ञेप्रमाणे सृष्टि कर. रामचंद्रा, ब्रह्मदेवाचे हे अणणे मानूस मान्य झाले. त्याने आपले दोन भाग केले. एका भागानें तो सूर्य होऊन आपल्या गतीने दिवस करू लागला व दुसऱ्या भागाने तो मनु झाला. या मनुरूपी सूर्याने ब्रह्मदेवास हवी होती तशी सृष्टि