पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार. रपि त्याचा उद्भव होऊ शकतो. यास्तव, राजा, आमच्या चित्तरत्नास हिरावून घेण्याचे सामर्थ्य तुझ्या ठायीं नसल्याकारणाने आमांस तुझ्या कोणत्याही दंडाची भीति वाटत नाही. प्रजानाथा, मला माझी ती प्रिया प्रत्येक दिशेत दिसत आहे. माझें मन तन्मय झाले आहे. त्यामुळे मला आनंदावाचून दुसऱ्या कशाचाही अनुभव येत नाही ८९. सर्ग ९०-भरत मुनींच्या शापाने त्यांचे देह नष्ट झाले, पण त्याची मानसी तन्म. ___ यता नाहीशी झाली नाही, असे येथे मागतात. भानु-देवाधिदेवा, त्या इद्रसंज्ञक ब्राह्मणाने राजास असे उत्तर दिले असता अधिकच रागावलेला राजा जवळच बसलेल्या भरत मुनींस ह्मणाला-भो भगवन , आपण सर्वधर्मज्ञ आहा. या दुष्टाचे धाष्टर्य आपण पाहिलेत ना! 'या पापी मूर्खास शाप देऊन आतां त्याचा निग्रह करा. अवध्य पुरषाचा वध केल्याप्रमाणेच वध्याचा वध न केल्यास पाप लागते. तेव्हा त्या मुनीने त्या दोघाही दुराचरणी स्त्रीपुरुषांच्या अक्षय्य पापाचा विचार करून व पतिद्रोह करणाऱ्या त्या दुष्ट स्त्रीविषयीं तर फारच तिरस्कार व्यक्त करून "तुमचा नाश होवो" असा शाप दिला तो ऐकून ती दोघेही निर्जनपणे ह्मणाली-तुझी दोघेही ( म. राजा व भरतमुनि ) अविचारी आहां कारण तसे नसता तर आमास शाप देऊन आपले तप क्षीण करून घेतले नसतेत. या शापाने आमचे देह नाहीसे होतील हे खरे; पण त्यामुळे आमची कोणती हानि होणार आहे ! आझी सूक्ष्म, चिन्मय व दुर्लक्ष्य हों व त्यामुळे आमच्या अतःस्वरूपाचा नाश कोणालाही करिता येणार नाही. असो; हे प्रभो, ती दोघे इतके बोलत आहेत तो शापप्रभावाने त्याची शरीरें तुटलेल्या वृक्षशाखेप्रमाणे खाली पडली. पुढे दृढ विषयरागाने बद्ध झालेली ती मृगयोनीत उत्पन झाली. त्यानतर पक्ष्याचे जन्म त्यास मिळाले. .आता ती दोघेही आमच्या स्वामीच्या ब्रह्माडात ब्राह्मणयोनीत उत्पन होऊन मोठ्या प्रेमाने रहात आहेत. या जन्मात पुण्याचरण करून ती आपल्या ग्रामणजन्माचे सार्थक करीत आहेत. भरत मुनीचा शापही व्यर्थ गेला नाही. कारण त्यांच्या दुराचरण करणाऱ्या शरीराचा निग्रह करून त्याच्या योगाने इतरांस भव वाटावे यान यानी तो दिला होता व त्याचा उपयोग झाला. शापादि- कांचा प्रभाव मनासारिख्या सूक्ष्म वस्तूवर होत नाही, हे त्यास माहीत