पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पतिप्रकरणं-सर्ग ८९. १०७ कृत्रिम जार इद्रही तिग सोडून राहीनासा झाला. काही दिवसानी हे पाप कर्म राजास कळ. तेव्हा त्या प्रजापालकाने त्या दोघांनाही असह्य देहदड केले. त्याचे शरीर भाजून काढले; तीक्ष्ण शस्त्रांनी ' त्यांस तोडिलें; हत्तीच्या पायांशी बांधिलें; तापलेल्या तेलाच्या कढईत टाकिलें व अशाच प्रकारच्या अनेक क्रूर शिक्षा केल्या. पण ती दोघे मोठ्या आनंदात होती. एकमेकांच्या आकाराचे अनन्य चित्ताने स्मरण करणाऱ्या त्याना दुःखाचे भानही झाले नाही. शेवटी हा सर्व चमत्कार पाहून राजा त्यास सणाला, " तुझा दुष्ट व पापी स्त्रीपुरुषाचे तुकडे करावे, असे माझ्या मनात आहे. पण तुमच्या शरीरावर शस्त्रास्त्रे चालतात्र नाहीत, याचे कारण काय ?" त्यावर तो कृत्रिम इद्र सणाला, “ राजा, मला हे सर्व जग या स्त्रीमय दिसत आहे. त्यामुळे मला हे शरीर-केश , मुळीच भासत नाहीत. हिची स्थितिही अशीच झाली आहे. हिचे चित्त माझ्यामध्ये गढून गेलें आहे व त्यामुळे हिला सर्व जम मन्मय, दिसते. तुमच्या या असह्य प्रहाराचे हिला भानच नाहींसें झालें आहे. राजन्, या शरीरात रहाणारा पुरुष मनोमय आहे. आमी दोघेही शरीरावरील अध्यास टाकून देऊन मनोमय झालो आहो. त्यामुळे आझांस भय, लजा, शोक इत्यादिकातील काही वाटत नाही. तुमच्या या दडाचा सबंध स्थूल देहाशी आहे. मनाशी नाही. या जगात मनाचा भेद करील असें काही नाही. देह क्षीण होवो की पुष्ट होवो. निश्चित मन, कधीही बदलत नाही. मन ही एक विलक्षण वस्तु आहे. तिच्यावर विचारावाचून दुसऱ्या कोणाचाही , अधिकार चालत नाही. फार काय, पण, वर, शाप इत्यादिकानीही मनाचे काही वाकडे होत नाही. आम्ही दोघेही मन:- प्रधान झालों भाहों. यास्तव पर्वताप्रमाणे एका विषयात स्थिर झालेल्या आमच्या मनास चचल करण्यास कोणीही समर्थ नाही. व्यर्थ उत्पन्न झालेली ही शरीरे मनाची कारणे नव्हेत. तर उलट मनेंच शरीराची कारणे आहेत. मन हेच आत्म्याचे प्रथम शरीर-आहे. बाह्य स्थूल शरीर त्याच्या कल्पनेने त्याच्या मागून होते. अर्थात् मन हा ससाराचा प्रथम अंकुर असून त्याच्यापासून देहरूपी शाखा, पछ्च, इत्यादि झाले आहेत. अंकुर नाहीसा झाला तर पल्लवादिकांचा उद्रव होऊ शकत नाही. पण शाखा, पलव इत्यादिकाचा. नाश.झाला असता अकुरामासून सुन