पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ते ब्रह्मदेव झाले. तेव्हा मनाची केवढी शक्ति आहे, ती पहा. मनाने देहाची व जन्म-मरणादि देह-धमोची जो भावना करितो तो त्या त्या देहास व त्याच्या धमीस प्राप्त होतो. बाह्यदृष्टि पुरुषासच सुख-दुःखा- दिकाचा अनुभव येतो. अतर्मुख योग्यास देहगत प्रिय व अप्रिय याचे भान होत नाही. पास्तव विविध भ्रांनी भरलेल्या या जगाचे कारण मनच आहे, यात काही सशय नाही. इद्र व अहल्या यांचा वृत्तांत याच सिद्धांताचे निदर्शन आहे. यास्तव मी तो तुला सांगतो. असले वृत्तात ठाऊक कसले तरी ते ऐकल्याने पवित्र दृष्टि प्राप्त होते. पूर्वी मागध देशांत इद्रद्युम्न या नावाचा एक राजा होता. त्याची चद्रबिबासारखी मुदर भार्या होती. तिचे नांव अहल्या. चंद्राच्या रोहिणीप्रमाणे त्यास ती प्रिय असे. त्याच प्रामांत इंद्र या नांवाचा एक बुद्धिमान् ब्रह्मपुत्र होता. तो परस्त्रीगामी असे. एकदा राजाच्या त्या अहल्या राणीने "इंद्रास अहल्या अतिशय प्रिय होती व त्या दोषांचा पूर्वी समागम झाला," इत्यादि आख्यान ऐकले. तेव्हापासून तिची चित्तवृत्ति क्षुब्ध झाली. तिला वाटले की, मीही अहल्या आहे. मग मजवर इंद्रप्रेम का करीत नाही? त्या राणीला प्रिय, सर्व गुणसपन्न व सार्व- भोम पतीही शत्रसारिखा दिसू लागला. तिचें चित्त एकक्षणभरही इद्राच्या चितनावाचून राहिना. तिला वेड लागल्यासारखेच झाले. "हा इंद्र आला, हा इद्र बसला" इत्यादि भलभलतेच ती बडबडू लागली. पण तिच्या सखीने ते ओळखिले व ती एकातांत तिला ह्मणाली, "तृ जर असले वेडे चार केले नाहीस व सावधान होऊन राहिलीस तर मी तुझी व इद्राची गाठ घालून देईन." त्याबरोबर ती तिच्या पायां पडली व 'इदाची लवकर भेट होईल, असें कर' असें झणून तिला विनवू लागली. ती सखी फार शहाणी होती. तिने राणीचे समाधान के व टळे " मी आज रात्री त्याला घेऊन येईन. पण तू अशी वेडी होऊन काही तरी बरळू नकोस." नतर ती गावात त्या ब्राह्मणपुत्राकडे गेली. त्याला हा वृत्तात सागितला व त्यास रात्री राणीच्या अतःपुरांत आणिलें. एका गुप्त गृहात त्याची परस्पर भेट झाली. अनेक अलंकारा- दिकानी भूषित झालेल्या त्यांनी एकमेकास सतुष्ट केले व ती दोघेही एकमेकाच्या प्रेमपाशात अतिशय आसक्त झाली. राणीस राजाचा कटाळा आला. त्या इंद्रावाचून तिला एक क्षणभरही चैन पडेनासे झाले. तो