पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ८९. ०५ जसे पडते त्याप्रमाणे तुझी इच्छा नसतांनाही तुजपासून सृष्टि उद्भवते. सूर्य जसा वारवार तोच तो दिवस करितो त्याप्रमाणे तूही वारंवार आपले कर्तव्य समजून सृष्टि रचितोस व तिचा संहार करितोस. तूं उद्यमाच्या इच्छेने यांतील काहींच करीत नाहीस. तेव्हां तू सृष्टि जर न केलीस तर आपल्या नित्यकर्मपरित्यागाहून दुसरे कोणतें अदृष्ट तुला प्राप्त होणार आहे ? यास्तव स्वच्छ आरशात जे पुढे येईल त्याचे जसे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे सज्जनाने प्राप्त कर्तव्य करावें. बुद्धिमान् पुरुष अप्राप्त कर्म करण्याची जशी इच्छा करीत नाहीत त्याप्रमाणे प्राप्त कर्माचा त्याग करण्याचीही इच्छा करीत नाहीत. यास्तव सुषुप्त पुरुषाच्या निष्काम बुद्धीप्रमाणे तू प्राप्त कर्तव्य कर. या ऐंदवाच्या सर्गानीच त संतुष्ट होत असलास तर बरेच झाले. कारण पुत्र, पौत्र, प्रपौत्र इत्यादिकाचा उत्कर्ष पाहून सतुष्ट होणे हा वडिलाचा धर्मच आहे. पण हे सर्व सर्ग तुला मनानेच (ह्मणजे अतर्दृष्टीनेच) दिसणे शक्य आहे. कारण ज्याने आपल्या मनाने सर्ग कल्पिलेला असतो त्यासच तो बाह्य दृष्टीने दिसतो, असा नियम आहे. या दहा सगांचा व त्यास निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचा नाशही कोणाला करिता येणार नाही. कारण त्याच्या दृढ चित्तामुळे हे सर्व सर्ग स्थिर झाले आहेत. प्राणी कर्मेंद्रियाच्या योगाने जे काही करितो त्याचा नाश इतरास करिता येतो. पण मनाच्या निश्चयाने बनविलेल्या वस्तूस दुसऱ्या कोणालाही 'रोध करिता येत नाही. मनानं दीर्घ काल अन्यास करून जे निश्चित केलेले असते, तें देह नाशानतरही नष्ट होत नाही. तस्मात् मानसिक निश्चय हाच सर्व उत्कर्षांचा व सर्व नाशाचा उत्तम उपाय आहे व इतर सर्व साधनें त्याच्या मानाने नुच्छ आहेत ८८. (येथें ऐंदवांचें भाख्यान समाप्त झाले.) सर्ग ८९-इंद्र व अहल्या याच्या मनोवृत्तीचा वृत्तात सांगून दृढ निश्चय दुसऱ्याच्या शेकडों प्रयत्नानीही शिथिल होत नाही, हे येथे व्यक्त करितात. भान-मन हेच जगाचे कर्तृ ( कती ) आहे. समष्टिमावास प्रान झालेले मन हाच परम पुरुष (हिरण्यगर्भ ) आहे. या लोकोत मनाने केलेले कर्मच खरे कर्म असून केवळ शरीराने केलेले कर्म खरें कृत- कर्म नव्हे. ऐंदव सामान्य ग्रामण होते. पण मानसिक दृढ भावनेने