पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. लोक आहेत, हे लोकपाल आहेत; हा दिवस गेला; ही माझी महा रात्र आली; हा मी भुवनेश्वरस्वरूपांत शांतपणे सित आहे;-इत्यादि भावना करीत राहिला त्यांची ती परम उपासनादीर्घ काल चालली त्यांचे मन ब्रह्मदे- वाच्या आकृतींत व कृतींत गढून गेले, त्याना त्याच्या शरीराचे भानही राहिले नाही; मग बाह्य तुच्छ विषयांची आठवण कोठून होणार ? पुढे काही कालाने वायु व तेज यांनी त्यांच्या शरीरास सुकवून साडिले, पण त्याना साचे भानच राहिले नाही. ती शरीरे श्वासादिरहित व शुष्क आहेत, असे पाहून कोल्ही, लाडगे इत्यादि हिस्र पशूनी त्यास तोडतोडून खाऊन टाकिलें. पण त्याच्या मनांत चाललेली भावना प्रतिबद्ध झाली नाही. तो कल्प क्षीण होईतो ते तसेच ब्रह्मभावना करीत राहिले. कल्पक्षय झाल्यावर बारा सूर्य उगवले, पुष्कराक्र्तादि मेघ वर्षाव करूं लागळे कल्पवात वाहू लागले; सवे भूतसमूह मरून गेले त्रिभुवन जलमय झाले व त्या ब्रह्मांडाच्या अधिपतीने सर्व सृष्टीचा सहार केला. पण हे प्रभो, येणेप्रमाणे सृष्टीचा सहार करून तू जरी निद्रित आलास तरी ते दहा ब्राह्मण तसेच चिंतन करीत होते. त्यानी तुझ्या संसाराप्रमाणेच आपल्या चित्ताकाशात दहा संसार उत्पन्न केले व तेच हे मसार आज तू आपल्या सूक्ष्म दृष्टीने पहात आहेम. मी त्याच्या त्या दहा सर्गातील एका सर्गाचा आदित्य आहे. पण हे जरी दहा सर्ग आहेत तरी तुला आपला स्वतंत्र सगे उत्पन्न करिता येण्यासारखा आहे. कारण जगत् हा मनाचा खेळ आहे. आसक्तीमुळे आपल्या चित्तात तो एक भ्रम उत्पन्न होत असतो. अर्थात् त्याच्या प्रमाणेच तुझी सृष्टिही भ्रममात्र असून, वास्तविक नसल्या- मुळे, तुलाही आपली सृष्टि करिता येण्यासारखी आहे ८६, ८७. सर्ग ८८-मानसिक निश्चय हाच सर्व उत्कर्षांचा उत्तम उपाय आहे, असे येथे सागतात. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, त्यानतर तो पितामह ब्रह्मा त्या भानूस पुनः आदराने ह्मणाला, “सूर्या, हे दहा सर्ग असताना मी आणखी निराळा सर्ग कशाला उत्पन्न करू ?" ते ऐकून तो ज्ञानी सूर्यही त्या पूज्य देवास उलट असें बोलला-खरे आहे; हे प्रभो, निरिच्छ व निष्क्रिय अशा तुला मिथ्या सर्ग कल्लून काय करावयाचे आहे. जगत्पते, ही सृष्टि तुझ्या विनोदाच्याच उपयोगी आहे. जलादि स्वच्छ उपापीत सूर्याचे प्रतिबिंब