पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ८६, ८७. १०३ झालेली ती दोघे आपल्या उत्तम गृही परत आली. काही दिवसांनी ती बामणी गर्मवती झाली. दहाव्या मासी निर्विघ्नपणे प्रसूत झालेल्या तिला दहा सुदर पुत्र झाले. ज्यांचे ब्राह्मणसंस्कार झाले आहेत, असे ते तेजस्वी सुत प्रत्यही वाढू लागले. सात वर्षांचे होतात तो ते सर्व वाक्यांत निष्णात झाले आणि उदय पावलेल्या शुक्राप्रमाणे ते उत्तरोतर अधिक तेजस्वी दिसू लागले. पुढे बऱ्याच दिवसांनी त्यांची आईबापें मरण पाऊन देव- लोकी गेली. पण त्यामुळे त्या दहाही ब्राह्मणास अतिशय दुःख झाले. ते घरदार सोडून विरक्त होऊन कैलास पर्वतावर गेले व उद्विग्न झालेले ते सर्व बांधव आपसांत असा विचार करू लमले-या जगांत कल्याण कोणते आहे ! सुखाचे साधन काय आहे व दुःखाचे साधन काय आहे? महत्त्व कोणते? ऐश्वर्य कोणते? शुभ महावैभव कोणते ? लोकाधिपति होणे, प्रामाधिपति बनणे, सामंत चक्राचा मुख्य होणे, गजाधिराज होणे, फार काय, पण इंद्रत्व प्राप्त करून घेणे हे सर्व व्यर्थ व तुच्छ आहे. कारण त्यांतील शेवटचे इंद्रत्व सुद्धा जर प्रजापतीच्या दोन घटिकाच रहातें तर या लोकच्या इतर ऐश्वर्याची कथा काय ? इत्यादि प्रकारे ते सर्व विचार करीत असता त्यातील वडील भाऊ इतरास मोठ्या गभीर वाणीने मणाला-" माझ्या प्रिय बांधवानों, या सर्व ऐश्वर्याहून मला हिरण्यगर्भाचे. ऐश्वर्य अधिक आवडते. कारण ते कल्प संपेपर्यंत नष्ट होत नाही. "ते त्याचे योग्य भाषण ऐकून इतर नऊ ऐंदव ( इंदुपुत्र ) "फार उत्तम, फार उत्तम " असें ह्मणून त्याची स्तुति करू लागले. त्यानी दुर्लभ ब्रह्मत्वाच्या प्राप्तीचा उपाय त्यास विचारिला. तेव्हा तो सणाला-तुमच्यापैकी प्रत्येकानें मी कमलासन ब्रह्मा आहे, मीच सृष्टीची उत्पत्ति व सहार करितो, अशी सतत भावना करावी. ह्मणजे ईश्वराच्या अबाधित नियतीप्रमाणे प्रत्येकास ग्रह्मत्व प्राप्त होईल. ___ ज्येष्ठ भ्रात्याचा हा उपदेश ऐकून ते नऊ जण एकाग्र चित्ताने तशीच भावना करीत चित्रासारखे स्थिर बसले. त्याच्या बरोबर तो वडील ऐंदवही उपासना करूं लागला. त्या दहा भावातील प्रत्येकजण-मी जगास उत्पन्न करणारा, त्याचे पालन करणारा व त्याचा सहारं करणारा, महेश्वर ब्रह्मा आहे; वेद, सरस्वती, गायत्री, मुनि, देव इत्यादि सर्व माझ्या माजुबाजुस बसले आहेत; हा मी उत्पन्न केलेला स्वर्ग आहे; हे इतर