पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ वृहयोगवासिष्ठसार. मग मनाच्या योगाने दिसते. याचा अर्थ काय ? असा विचार करीत मी बराच वेळ पहात राहिलो. नंतर त्या जगजालांतून एका भास्करास मनाने बोलावून आणून मी पटले, “ हे देवा, ये. हे महा तेजस्विन् , तुझें स्वागत असो; मी विचारतो त्याचे मला उत्तर दे. तूं कोण आहेस? हे जग व त्या पलीकडे दिसणान्या दुसन्या सृष्टया कशा झाल्या ?" हा माझा प्रश्न ऐकून आश्चर्यचकित झालेला भानु सणाला, "प्रभो, या दृश्य प्रपचाचे कारण आपणच आहां. पण जणु काय ठाऊकच नसल्याप्रमाणे मला प्रश्न करितां, याचा अर्थ काय ? कदाचित् माझी परीक्षा पहाण्या- करिता मापण हे मला विचारीत असाल. यास्तव मी आपली अचिन्य उत्पत्ति सांगतो, ती ऐका. भो भगवन् , या सृष्टीत सत्, असत् इत्यादि कळांनी जें जें सर्वत्र भासत असतें तें तें सर्व मन आहे ८५. सर्ग ८६,८७-या सर्मात भार्येसह इंदु ब्रामणाने पुत्रार्थ केलेलें तप, त्याच्या योगाने त्यास झालेले दहा ऐंदव व त्यांतील ज्येष्ठाच्या उपदेशाने सर्वांनी केलेली प्रयोपासना, याचे वर्णन करतात. भानु-हे महादेवा, तुझ्या कल्पनात्मक कालच्या दिवशी कैलास पर्वताच्या खाली असलेल्या जबूद्वीपाच्या एका कोपऱ्यात सुवर्णजट नावाचा जो एक प्रदेश होता त्यात मरीचि-प्रभृति तुझ्या पुत्रांनी प्रजा उत्पन्न करून तिच्या निवासार्थ एक सुदर मोठे मडल कल्पिलें. त्यात एक सोम या नावाचा अति धर्मात्मा ब्राह्मण होता. तो ब्रह्मविद् व शांतस्वभाव भसून कश्यपाच्या कुलांत त्याचा जन्म झाला होता त्या महात्म्याची प्राणतुल्य प्रिय भार्याही महासाध्वी व पतिसेवापरायण होती. पण माळ- भूमीवर जसा एकही अंकुर उगवत नाही त्याप्रमाणे तिच्या ठायीं एकही अपत्य झाले नाही. तेव्हा त्या दोघानीही कैलास पर्वतावर जाऊन पुत्र- प्राप्त्यर्थ उग्र तप केले. सर्व दिवसभर वृक्षाप्रमाणे निश्चल राहून सायकाळी एक चुळकाभर पाणी प्यावयाचे असा नियम करून, त्रेता व द्वापर या दोन युगात त्यानी तें व्रत चालविले. त्यानतर शंकर प्रसन्न होऊन त्याच्या जवळ आला व आग्रहाने वर मागण्याविषयी सागू लागला. तेव्हा प्रणाम करून त्या उभयतानी आमास कल्याण गुणानी युक्त व अतिबुद्धिवान् असे दहा पुत्र व्हावे, हा वर द्या, असे सांगितले. त्या बरोबर 'तथास्तु' भसे मणन तो ईश्वर अंतर्धान पावला. पुढे इष्ट वर-प्राप्तीने संतुष्ट