Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरभ केला होता, पण पहिलीं लहान लहान दोन प्रकरणे सपवून त्यानीं आपले मासिक बंद केलें. वर सांगितलेले ओवीबद्ध प्रथ बरेच कठिण असून शिवाय मूळ ग्रंथाचें रहस्य त्यांत पूर्णपणे आलेले नाहीं. फार काय, पण त्या अनुभवी साधून त्यांतील प्रकरणाची नावेंही निराळींच ठेविली आहेत. त्यामुळे मूळ प्रथाचे प्रकरणशः ज्ञान त्यावरून होत नाहीं. भाऊशाख्यांप्रमाणे शब्दश: भाषातर केल्यास तें जरा कटाळवाणें व विस्तृत होण्याचाही बराच सभव आहे. शिवाय त्यांच्याच पद्धतीचे अव- लंबन केल्यास त्यांना पुनः ते ल्याहावयाचे झाल्यास अडचण पडणार; इत्यादि गोष्टींचा विचार करून मी हे अगदर्दी सरळ व सोप्या भाषेत सार लिहिले आहे. त्याच्या गुणदोषाचें परीक्षण वाचकांनी करावें. यात मूळ प्रथाचें शब्दश: भाषांतर जरी नसले तरी मूळ व टीका यातील कोणताही महत्त्वाचा भाग सोडलेला नाहीं. विस्तार मात्र करवेल तितका कमी केला आहे. पुनरुक्तींनाही बराच सक्षेप दिला आहे. काही ठिकाणीं प्रसगाला शोभतील असे नवेच दृष्टात दिले आहेत व क्वचित् अधिक वर्णनही केले आहे. अनेक रमणीय आख्याने व वर्णनें यानीं युक्त असलेला हा प्रथ वाचून वेदान्तभक्तास व इतरा- सही पुष्कळ आनंद होईल व पुढचे दोन भाग वाचण्यासही ते उत्सुक होतील, अशी मला मोठी उमेद आहे.

मूळ ग्रंथाच्या कर्त्याविषयीं व कालाविषयीं मोठा वाद आहे. कोणी

म्हणतात कीं, जवळ जवळ वाल्मीकिरामायणा इतकाच हा ग्रंथ जुना असून दोघाचे कर्ते वाल्मीकिमुनीच होत. कित्येक आधुनिक म्हणतात की, रामायणापेक्षां या ग्रंथाची भाषा कठीण आहे, व विषयही अद्वैत वेदान्त आहे. यास्तव श्रीशंकराचार्यांच्या मागून त्याच्या परपरेतील कोणतरी विद्वान् यतीनें हा ग्रंथ रचिलेला असावा शिवाय श्रीमत् आचार्योच्या भाष्यांत यांतील एकाद्याही लोकाचें अवतरण घेतलेले आढळत नाहीं. तेव्हां हा प्रथ त्यांच्यावेळीं उपलब्ध नव्हता, असेच म्हणावे लागते. यावर माझ्यासारख्या सारग्राही मनुष्याचें एवढेच उत्तर आहे कीं, यांतील कोणताही पक्ष जरी खरा असला तरी त्यांत आमची किंवा वेदान्त-शास्त्राची कोहीं हानि नाहीं, आम्हांला प्रथाच्या तात्पर्या- कडे पहावयाचे आहे. त्याचा कर्ता व काल या गौण गोष्टींकडे फारसें