पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पचिप्रकरण-सर्ग ८५. लगविले. तेव्हा ते गगन तम व तेज यांतील एकानेही व्यास नसन विस्तृत, शून्य व अंतरहित आहे, असे मला आढळले; पण मी आतां यांत सर्ग उत्पन करितों, असा निश्चय करून जेव्हा सूक्ष्म चित्ताने पाहूं लागलों तेव्हा मला मोठमोठे दहा सर्ग दिसले. त्यात माझ्यासारखेच दहा ब्रह्मदेव हंसावर आरूढ झाले होते. त्या प्रत्येक सर्गाची रचना प्रायः एकसारखीच होती. नद्या वाहत होत्या, समुद्र आपल्या उदरात जलसंचय करीत होते; सूर्य दिवस व रात्र करीत होता; अग्नि पाकादि क्रिया करीत होता; वायु वहात होता; पर्वत पृथ्वीस धारण करीत होते; वृक्ष, वनस्पती, औषधी आपापल्या स्वभावाप्रमाणे नियमित कामे करीत होत्या; देव स्वर्ग- लोकी क्रीडा करून सुख भोगीत होते; मनुष्ये भूलोकी को कसन बरेच दुःख व थोडेसें सुख भोगीत होती; दानव व सर्प पातालात आपल्या योग्यते- प्रमाणे व्यवहार करीत होते; काल व त्याचे वर्षादि विभाग आपापलें कालपरिमाणाचे कृस्य थोडासाही प्रमाद न करिता करीत होते; वेद, स्मृत्या, पुराणे, इत्यादि शब्दराशी शुभाशुभ आचाराचा उपदेश करण्यास तत्पर होता; कर्माप्रमाणे प्राण्यास स्वगे अथवा नरक देणान्या ईश्वरशक्ती आपलें नियत कर्तव्य सतत करीत होत्या व प्राणी भोग किवा मोक्ष यातील कोणत्या तरी एका पुरुषार्थाची इच्छा धरून प्रयत्न करीत होते. साराश याप्रमाणे त्यांतील प्रत्येक सगीत सात ऊध्वे व अधो लोक, सात द्वीप, सात समुद्र, सात पर्वत, चार प्रकारचे प्राणी, देवादि अनेक योनी इत्यादि सर्व असून त्यातील प्रत्येक प्राण्याचे, इष्टप्राप्ति व अनिष्ट निवृत्ति या एका उद्देशाने, निरनिगळे अनेक उद्योग चालले होते. कोणी मरत आहे; कोणी उत्पन्न होत आहे; कोणी यमयातना भोगीत आहे; कोणी नदन- वनांत विलास करीत आहे; कोणी रडत आहे; कोणी हसत आहे; कोणी जात आहे; कोणी येत आहे, एव च प्रत्येक ब्रह्माडात प्रत्येक प्राण्याची धडपड चालली आहे. उबराच्या फळांतील किड्याची व त्याची अवस्था अगदी एकसारखीच आहे, असा मला त्यावेळी भास झाला. इकडे युग, कल्प, वर्ष इत्यादि प्रमाणानी काल त्यांचा गुपचीप समाचार घतच होता. पण त्याचे भान त्याना त्या गडबडीत कोठून होणार ! पण हे सर्व शुद्ध चित्ताने पाहून मी आश्चर्यचकित झालो. हे काय आहे व कसे झाले ? मासमय नेत्रानी कधीही न दिसणारे हे मायाजाळ