पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४०० बृहयोगवासिष्ठसार. संसाराचा नाश होय. साध्य, पालनीय, विचार्य, कार्य, आहार्य (एके ठिका- णची वस्तु दुसऱ्या ठिकाणी नेणे)व्यवहार्य, संचार्य, भूषणादि धार्य इत्यादि सर्व हे चित्त आहे. कारण चित्त नाही तर यांतील काहीएक नाही. हे एवढेसें चित्त आपल्यामध्ये सर्व जग धारण करिते. त्याचे चित् व जड असे दोन भाग आहेत. त्यांतील पहिला भाग हेच सर्व अर्थीचे बीज आहे व दुसरा भागच हे सर्व जग आहे. त्यांतील पहिल्यास द्रष्टत्व व दुसऱ्यास दृश्यत्व आहे, असे हटले तरी चालेल. असो; राघवा, चित्त हे बालक असून ते जग हे भूत पहात असते. विवेक हा त्यास नाहीसे करण्याचा मत्र आहे. त्याच्या योगाने भूत पळून गेले की, तें चित्तबालक आपले निरुपद्रवी स्वरूप पाहू लागते. यास्तव मी आता उपमा देऊन सागतो तें ऐक दृष्टाताची योग्यता फार मोठी आहे युक्त व मधुर वाणीने त्याचा निर्देश करून सागितलेले दुर्बोध तत्त्वही श्रोत्याच्या, जलात टा- किलेल्या तैलबिंदूप्रमाणे विकास पावलेल्या, हृदयात प्रवेश करिते, पण दृष्टातावाचून तत्त्वार्थ सागू लागल्यास तो श्रोत्यांच्या हृदयात प्रवेश करीत नाही. तर राखेंत ओतलेल्या घृताप्रमाणे तो व्यर्थ जातो.या भूलोकी जेवढी आल्याने व कथा आहेत त्या सर्वाचा उपयोग प्रमेय-ज्ञानाकरिताच करावा लागतो. कारण सूर्याच्या प्रकाशाने जसे जग व्यक्त होते त्याप्रमाणे दृष्टातादिकाच्या योगाने प्रमेय व्यक्त होऊन श्रोत्याच्या चित्तावर आरूढ होते ८४. सर्ग ८५.-सृष्टि करण्याची इच्छा करणाऱ्या ब्रह्मदेवास दहा ब्रह्माडे दिसली व त्यातील एका सूर्याने त्यास त्याचे तत्त्व सागितले, असे येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, पूर्वी एकदा मी ब्रह्मदेवास विचारले की, हे सर्व सर्ग कसे होतात. तेव्हां त्याने मला हे उत्तम ऐंदवाख्यान सागितले. तो ह्मणाला-बा पुत्रा, जगास धारण करण्याच्या शक्तीने युक्त असलेले मनच हे सर्व करिते. पूर्वी एकदा दिवस उजाडला असता मी जेव्हा संसार निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा काय झाले ते ऐक. एकदा दिवस सपला ( मावळला ) असतां सर्व सर्गाचा संहार करून मी एक- व्यानेच ती रात्र स्वस्थ चित्ताने घालविली. नंतर दिवसाच्या भारभी यथाविधि संध्या करून प्रजा उत्पन्न करण्याकरिता आपले नेत्र आकाशात