पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ८१. ३९९ अज्ञ जनाच्या बोधाकरिता ही सर्व कल्पना केलेली आहे व तिच्या योगाने व्यवहारास बराच लाभ होतो. यास्तव तिला व्यावहारिक सत्यत्व आहे. असें तू जाण. या विलक्षण सृष्टीचे तत्त्व जाणले की, द्वैत रहात नाही. ह्मणजे अज्ञास जरी ते भासले व त्याचा व्यवहारही यथास्थितपणे चालला तरी प्रज्ञास ते ब्रह्माइन निराळे भासत नाही. मौन हेच ज्ञानाचे लक्षण आहे. हे जग असें आहे; त्याचे कारण अमुक आहे; त्याची उत्पत्ति अशा अशा रीतीने झाली आहे इत्यादि कोणी कितीही जरी आक्रोश करून सागू लागला तरी ज्ञानी तिकडे लक्ष्य देत नाही व स्वतः तें असें आहे किंवा नाही याविषयी चकार शब्दही बोलत नाही. बोलण्यास आरंभ केला की तत्त्वास आपण मुकलों, हे तो पूर्णपणे जाणून असतो. कारण द्वैतावाचून शब्द व अर्थ यांचा बोध होत नाही व त्याचा उपयोगही करिता येत नाही अर्थात् तत्त्वाकरिता ह्मणून आपापल्या समजुतीप्रमाणे तर्क करून विवाद करणारे सर्व तत्त्वज्ञानशून्य आहेत, असे समजण्यास कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही. असो, हे रघूत्तमा, हे ब्रह्म आहे. त्याच्यापासून झालेले हे जग आहे. ब्रह्म कारण आहे जग त्याचे कार्य आहे. इत्यादि कथन करणे हा सर्व तत्त्वोपदेशाचा उपाय आहे. ज्ञान झाल्यावर द्वैत उरत नाही यास्तव तू आपल्या शुद्ध मतीची निष्ठा महावाक्यात स्थिर करून व माझ्या उपदेशांतील किवा दुसन्या प्रमाण वाक्यातील निर- निराळ्या शब्दाकडे लक्ष न देता तत्त्वार्थाकडे ध्यान दे. आकाशात दिस- णाऱ्या खोट्या गधर्वनगराप्रमाणे अनिर्वाच्य कारणापासून व्यक्त झालेले मन भ्रातिमात्र अशा या जगास भासविते. आता ते हा सर्व चमत्कार कसे करितें तें दृष्टात देऊन सागतो. ते ऐकल्याने हे सर्व भ्रातिमात्र आहे. असा तुझा आपोआप निश्चय होईल. तू वासनेचा त्याग करशील. केवळ मन:कल्पित जगाचा त्याग केल्यामुळे तूं शातात्मा होशील व माझ्या उपदेशाकडे ध्यान देऊन मनोव्याधीचा नाश करण्याकरिता विवेकरूपी औषधीच्या योगाने यत्न करशील. मी आता या पुढे जी आख्या- यिका ( कथा ) सागणार आहे तिच्यावरून तुला हे पुढील तत्त्व समजेल. चित्तच जगाच्यारूपाने व्यक्त होते. वाळूमध्ये जसें तेल नसते न्याप्रमाणे या सृष्टीत शरीरादि काही नाही. राग, द्वेष, इत्यादि क्लेशानी दूषित झालेले चित्तच ससार आहे. रागादिकानी रहित असलेले चित्त हाच