पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ वृहयोगवासिष्ठसार, श्रीवसिष्ठ-असो; रामा, कर्कटीचे हे विचित्र चरित्र मी तुला सागितले. राक्षसाची अनेक कुळे असतात व त्यांच्या अगाची कातिही लाल, काळी, पिवळी, हिरवी इत्यादि नानाप्रकारची असते. त्याप्रमाणे हिचा वर्ण काळा होता व आकार खेकड्याच्या आकारासारखा असल्या कारणाने तिला कर्कटी (म्ह. खेकडी) हे नाव पडले. जगत्तत्त्वाचे निरूपण करीत असतांना मला तिच्या त्या प्रश्नांचे स्मरण झाले व त्यामुळे मी ही आख्यायिका येथे सांगितली. आदि व अत यानी रहित अशा एका परम कारणापासून हे जग झाले आहे. त्या परम कारणांत भूत, वर्तमान व भविष्य सृष्टी अनंत आहेत. बीजच जसे फल होते व त्यामुळे फल आणि बीज यांच्यामध्ये तात्त्विक भेद नसतो त्याप्रमाणे ब्रह्मच जग झाले आहे व त्यामुळे जग व ब्रह्म यात तात्त्विक भेद नाही. भेद केवळ भासमान आहे. पण तो तात्विक अभेदास नाहीसे करू शकत नाही. चित्त व चित्तविषय याचा भेद अविवेका- मळे भासत असल्यामुळे तो विवेकाने नष्ट होतो. भेद ही भ्राति आहे. विवेक केला असता ती जशी येते तशीच जाते. यास्तव रामभद्रा, विवेक कर. म्हणजे तुझी ही द्वैतभ्राति जाईल व त्यामुळे तुला अखंड बोधाचा लाभ होईल. अखड बोध हेच ब्रह्म आहे. माझ्या या उपदेशाने तुझी भ्राति-प्रथि सुटली म्हणजे शब्द व अर्थ याचा भेद जरी तुला न भासला तरी त्याच्या वरून ज्ञात होणारे तत्त्व तुला प्रत्यक्ष दिसेल. तत्त्वसाक्षात्कार झाला असता अनर्थास कारण होणारे चित्त, स्वतः अनर्थ व चित्ताचेही कारण अविद्या याचा निःसंशय नाश होईल. ब्रह्मापासून हे सर्व निर्माण झाले आहे व ब्रह्मामध्येच तें लीन होणार, हे माझ्या तोडून ऐकून तू स्वतः जवळ विचार करून पाहिलास की, तुला पूर्ण ब्रह्म साक्षात् दिसेल. आता ब्रह्मापासून हे सर्व झाले, असे माझें वचन ऐकून ज्याच्यापासून हे झाले ते याच्याहून निराळे असेल, अशी तुला शंका येईल. पण बाबारे, 'ब्रह्मापासून' इत्यादि सर्व भेद-व्यवहार वास्तविक नसून तो केवल जिज्ञासूस तत्त्वार्थ समजविण्याचा उपाय आहे. हे याचे कारण, हे याचे कार्य इत्यादि सर्व व्यवहार, व्यावहारिक अवस्थेपुरताच आहे. वस्तुतः ती सर्व मिथ्यादृष्टि आहे. कारण तालिक दृष्टीने पाहू लागलें झणजे कार्य व कारण याचा निर्णयच करिता येत नाही. यास्तव