पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पतिमरण-सर्ग ८१. ३९७ खा. त्यानंतर थोडिशी वामकुक्षी करून तू पुनः समाधिस्थ हो. आता प्राण्यांची हिसा करणे तुला व मलाही इष्ट नाही व त्याप्रमाणे तू प्रतिज्ञा- ही केली आहेस. पण वध्य क्रूरांस मारणे ही हिंसाच नव्हे. कारण अशा थोड्याशा दुष्टास निर्दयपणे मारल्याने सहस्रावधि प्राण्यांवर उपकार व दया केल्याचे श्रेय मिळत असते. असो, रामा, राजाच्या ह्मणण्याप्रमाणे शेवटी ती सौम्य झाली व त्याच्या मागोमाग राजगृहात गेली. तेथे तिच्या राहण्याची योग्य व्यवस्था लावून प्रातःकाल होताच आपल्या सर्व राष्ट्रांतून सर्व वध्य पुरुष आण- ण्याकरिता त्यानी शेंकडों सैनिक पाठविले. त्यानी सहा दिवसात तीन सहस्र वध्य मानव धरून आणिले. तेव्हा सहाव्या दिवशी रात्री ती राक्षसी राजाच्या इच्छेप्रमाणे भयकर होऊन त्या सर्वास दोन्ही हातांत व वेगेंत धरून स्वस्थळी गेली. जाताना " पुनरपि समाधींतून उठल्यावर तू येथे ये. तोपर्यंत सर्व वध्य आह्मी येथे साठवून ठेवितो." असें राजाने तिला आग्रहाने सागितले होते. असो, हिमालयाच्या शिखरावर पोचल्यावर केळ्याप्रमाणे तिने त्याचा आहार केला व पाणी पिऊन तीन दिवस स्वस्थ झोप घेतली. उठल्यावर पुनरपि समाधि लावावी अशी तिला इच्छा झाली व त्याप्रमाणे तिने लागलेच केले. पुढे प्रत्येक चार-पाच वर्षानी ती समाधि सोडून उठे व राजाच्या प्रामात येई आणि साठविलेल्या वध्यांस घेऊन त्या शिखरावर जाई. तेथे त्यांस खाऊन व झोप घेऊन ती पुनः समाधिस्थ होई. काही दिवसांनी तो राजा मरण पावला. तरी त्याच्या सिंहासनावर बसणाऱ्या पुढच्या राजानीही तिला तृप्त करण्याचा क्रम तसाच चालविला. फार काय पण तिचे त्यांनी आपल्या नगरात मदिर बाधले. त्यात कदरा भगवतीची स्थापना केली व जो नराधम तिची पूजा करणार नाही त्याला ती अतिशय पीडील अशी कल्पना लोकात रूढ झाली. साराश येणेप्रमाणे ती कर्कटी ध्यजनाचे बळी घेऊन तृप्त होऊ लागली व त्या परम-तत्त्वज्ञानी राक्ष- नीचा सर्वत्र जय-जयकार सुरू झाला, हे येथे निराळे सागावयास कोच ८२, ८३. नर्ग ८४- त्या राक्षसीस कर्कटी हे नाव पडण्याचे कारण, उपदेशाकरिता या गोष्ठीची केलेली योजना व दृष्टाताचा उपयोग याचे वर्णन येथे करितात.