पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९६ बृहद्योगवासिष्ठसार. जीवास पीडा दिली व त्यांना पिडून खाले. पण ब्रह्मदेवाने वर देतानाच "तू गुणी पुरुषास पीडा देऊ नकोस" असें सागून माझ्या नियमनार्थ एक मत्रही योजून ठेविला आहे सर्व हृदयशूलाचा नाश करणारा तो महामत्र मी तुझास देतें. मी फार दिवसापासून या हिसा कर्मात प्रवृत्त झाले आहे व त्यामुळे हृदय-व्यथेनें पीडलेले लोक प्रत्यही क्षीण होत चालले आहेत. असो; बा सज्जना, तुला हवा असलेला मत्र मीच देते. कारण प्रयत्नशील सामर्थ्यवानास असाध्य असे काहीएक नसते. आपण आता या नदीच्या तीरी जाऊ चला. तेथे शुचिर्भुत होऊन ब्रह्म- देवाने सागितलेला मत्र मी तुह्मास देईन. दशरथप्नुता, हे तिचे भापण ऐकून मनात थोडेसे साशक झालेले ते दोघे मोठ्या सावधपणे तिच्या बरोबर नदीतिरी गेले. तिच्या शुद्धभावाविषयी त्यानी चागलेच परीक्षण केले व नतर तिच्यावर शुद्ध प्रेम व विश्वास ठेविला. तिने त्यास तो दिव्य मत्र दिला व आपल्या पूर्वस्थळी जाण्याचा निश्चय केला. पण इतक्यात राजा ह्मणाला-महादेहे, तू आता आमची पूज्य गुरू झाली आहेस. यास्तव तुला उपाशी पाठविणे आझास शोभत नाही. तू काहीतरी खावेस अशी आमची फार इच्छा आहे. तिचा भग तू करू नयेस. सुजनाचे प्रेम एकमेकास पहाता क्षणीच जडते, असा अनुभव आहे व त्यानतर ते एकमेकाचा मनोरथ पूर्ण केल्यावाचून रहात नाहीत. यास्तव तूं आतां सुंदर व लहानसें रूप घेऊन आमच्या येथे चल. तेथे तू मोठ्या आन- दाने रहाशील. त्यावर ती ह्मणते-राजा, तूं सौम्यरूप व सौम्य स्वभाव धारण करणाऱ्या मानुषीचे संगोपन करण्यास समर्थ आहेस, हे मी जाणते, पण मज राक्षसीच्या क्षुधेची शाति तू कशी करणार? कारण राक्षसांच्या अन्नानेच माझ्या या जठराची तृप्ति होणे शक्य आहे. शरीर असे पर्यंत न्याचा पूर्वसिद्ध स्वभाव बदलत नसतो, हे तुलाही ठाऊक असेलच. राजा-होय, हे देवि, वस्तुस्थिति अशी आहे, हे मी जाणतों. पण तू मनुष्य-स्त्रीस्वरूपाने आमच्या येथे काही दिवस रहा. इतक्यात माझ्या राष्ट्रात दुष्कमें करणारे, चोर, इत्यादि जेवढे ह्मणून वध्य आहेत त्या सर्वास आणवून मी तुझ्या स्वाधीन करीन. त्या सहस्रावधी प्राण्यास तूं हिमालयाच्या शिखरावर घेऊन जा व तेथे एकांतात बसून त्यास आनंदाने