पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ८१, ८३. ३९५ भयकर व शून्य मार्गात आलो आहे. कारण दीन व दुर्बळांस पीडा देणान्या दृष्टाचा जर ही निग्रह केला नाही तर आमचे राजत्व काय कामाचे ? असो, आमास पाहिजे आहे तसला मत्र तुजपासून मिळेल असे दिसत नाही. यास्तव तू आता आमावर एवढा तरी अनुग्रह कर की, आजपासून कोणाचे प्राण घेऊ नकोस. कारण हिसेसारखें पाप दुसरे कोणतेही नाही व प्राणनाशा-इतके दुःख प्राण्यास दुसऱ्या कशानेही होत नाही. इतर अज्ञ व अविवेकी हिसेवरच आपला निर्वाह करीत असतात, हे खरे, पण आझा ज्ञानी व विवेकी ह्मणविणारांस तेच कृत्य शोभत नाही. रामभद्रा, त्या दयाळ राजाचे हे भाषण ऐकून कर्कटीने "मी आज- पासून काणालाही मारणार नाही” अशी सत्य प्रतिज्ञा केली ती ऐकून राजास मोठा आनद झाला व तो पुन तिला ह्मणाला, " पण हे देवि, तुझी शरीरस्थिति कशी होणार ? तू माझे इष्ट सपादन केलेस हे खरें, पण त्याकरिता तुलाही पीडा व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. अन्नाने होणारी तृप्ति व त्याच्या अभावी होणारे दुख ही दोन्ही अवर्णनीय आहेत. यास्तव मी तुझ्या तृप्तीचा उपाय कोणता योजू, ते तूच मला साग. त्यावर राक्षसी ह्मणते-राजन्, मी या पर्वताच्या शिखरावर सहा महिने समाधिस्थ होते व ती सोडून उठताच मला पूर्व दृढ मकल्पामुळे क्षुधा लागली. तेव्हा तिची शाति करावी ह्मणून मी प्राण्यानी भरलेल्या या तुमच्या राष्ट्रात आले. पण आता पुन पूर्वस्थळी जाऊन मी ध्यान लावून बसते. चित्ताचे ऐकाय झाले असता तहान-भूक इत्यादि सर्व शरीरधर्माचा विसर पडून मोठे सुख होते. यास्तव मरेपर्यत मी धारणा धरून शरीराचे रक्षण करीन पुढे त्याच्या नाशाचा काल जेव्हा यदृच्छेने येईल सेव्ही मी त्याचा परित्याग करून परम आनदात मिळेन. इत उत्तर प्राण असे- पर्यत निरपराधी प्राण्याची हिसा करावयाची नाही, हा माझा निश्चय दृढ़ झाला आहे. या उत्तर दिशेतील प्रसिद्ध हिमालयाच्या एका शिखरावरील कदरेमध्ये मी असते. माझें नाव ककेटी आहे. सर्व जनसमूहास मार- ण्याच्या इच्छेने मी तपाच्या योगाने ब्रह्मदेवास सतुष्ट केले. प्राण हरण करणारी विषूचिका नामक सूची मी व्हावे, अशी माझी फार इच्छा होती. ब्रह्मदेवानेही मला अनुकूल वर दिला. मी पुष्कळ वर्षे विचिका होऊन