पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. मुळीच नसलेल्या त्याचे खंडन कसें कोण करणार ? सारांश हे निशाचरि, त्या एका महा अणूनेच हे सर्व व्यापिलें आहे, रचिले आहे, उत्पन्न केलें आहे, रक्षिलें आहे, पुनः आपल्यामध्ये लीन कलें आहे, सुदर करून दाखविले आहे; व सर्वास तुच्छ करून सोडिले आहे. चिदणुवाचून काही नाही व तोच एक सत्य आहे. या वाक्यात तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे ८१. सर्ग ८२, ८३-वरील उत्तर ऐकून राक्षसी प्रसन्न झाली. तिने त्या दोघाम मत्र दिला व त्यानी समाधि मोडून उठलेल्या तिला सतत भोजन दिले, असे येथे वर्णन करितात, श्रीवसिष्ठ--राघवा, राजाच्या तोडातून निघालेला हा तत्त्वार्थ ऐकून कर्कटी प्रसन्न झाली. त्याच्या विषयींचा तिचा मत्सर कमी झाला व तिचे चित्त शात झाले. ती ह्मणाली-तुह्मा उभयताची अमृततुल्य वाणी ऐकून माझें समाधान झाले. तुमचा बोध अति उज्ज्वल असून तुमची बुद्धिही अति पवित्र आहे. चद्रमडलापासून निघालेल्या चद्रिकेप्रमाणे तुमच्या हृदयातून निघालेला हा ज्ञानप्रकाश मला फारच आनद देत आहे. तुमच्यासारखे विवेकी जन जगत्पूज्य व सेव्य आहेत. चद्राच्या सहवा- साने चद्रविकासी कमल जसे फुलते त्याप्रमाणे तुमच्या या सत्सगाने माझें हृदय प्रफुल्लित झाले आहे. पुष्पाच्या सगाने जसा मातीसही वास लागतो त्याप्रमाणे या सत्सगाने माझे शुभ झाले आहे. महात्म्याच्या समागमाने दुःख नाहीसे होते. या अरण्यात तुझी मला भूलोकचे सूर्यच ला- धला, यात संशय नाही. आता मला तुमचा सत्कार केला पाहिजे मी तुमचे कोणते शुभ करूं ते सागा. हे ऐकून राजा ह्मणाला-हे राक्षसकुलभूषणे, या देशातील लोकाच्या हृदयात शूलादिकाची पीडा सदा होत असते. माझ्या राष्ट्रातील सर्व लोक विषूचिकेच्या विकाराने सतप्त झाले आहेत. त्याच्या सर्व पीडाचे निवारण करणे हे माझे कर्तव्य आहे. पण या दीर्घ कालापासून त्राहि त्राहि करून सोडणान्या उपद्रवाचे निवारण कसे करावे, हे मला पुष्कळ विचार केल्यावरही समजेना. औषधो- पचारादि लौकिक उपाय करून पाहिले. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा तुजसारख्या एकाद्या सिद्धापासून यावर एकादा मत्र किंवा तोटगा मिळाल्यास पहावा ह्मणून आह्मी दोघे या मध्यरात्री अशा