पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पचिप्रकरणं-सगे ८१. ३९३ आब्रह्मस्तंभपर्यंत जगास आपल्या अधीन करून घेऊन पाहिजे तसे नाचावयास लावितो. वस्त्राने जसें एकाद्या पदार्थास झांकावे त्याप्रमाणे या अणूनच सर्वास आच्छादित केले आहे. दिशा, काल इत्यादिकांनी मर्यादित न होणारा हा मेरूहूनही मोठा आहे. केसाच्या अग्राच्या शभराव्या भागाहूनही सूक्ष्म असाही हाच होय. हे राक्षसि, तू या शुद्ध ज्ञानस्वरूप आत्म्यास अणु ह्मणून झटलेंस, व त्या तुझ्या शब्दाचाच आह्मी येथें अनुवाद केला आहे, पण ते चिदाकाश सूक्ष्म आहे, एवढ्याच करिता अणु होऊ शकत नाही, हे तू विसरू नकोस. वेदांतही त्यास " अणहून अणु " असे झटले आहे, पण ते त्याचे परम सूक्ष्मत्व दाखविण्याकरिताच होय. या आत्मदीपावाचून कोणताही प्रकाश किवा अप्रकाशमय पदार्थ व्यक्त होऊ शकत नाही. यास्तव हाच तम व प्रकाश याचा प्रकाश आहे. शिवाय हा जर मुळी नसताच तर सर्व जग असत् व ज्ञानशून्य झाले असते. या चिदणमध्येच सर्व अनुभ- वाचा उद्भव होतो. हा परमात्मा अति सूक्ष्म असल्यामुळे स्वतः स्वाद- रहित आहे, पण इद्रियाच्या द्वारा सर्व विषयाचा स्वाद घेतो. जलात रस असतो पण त्याची रुचि घेणारा हा, जल नव्हे. हा ज्याचा ज्याचा त्याग करितो तें तें मरते ( असत्, जड होते ). दूर्वाच्या वनात गज जसा लपून राहू शकत नाही त्याप्रमाणे हा आत्माही आपणास या जगात कोठेही छपवू शकत नाही. कारण याचे चैतन्य जेथे तेथे व्यक्त झालेले दिसते. चैतन्यरहित जग सत्य नाही. तर ते चैतन्ययुक्त अस- तानाच सत्य आहे. या सूक्ष्म चिदात्म्यात असंख्य जगे असतात. सर्व चिन्मय आहे. मागची भूर्ते चैतन्यातच होती. वर्तमान भूतेही चैत- न्यातच आहेत, व पुढे होणारी भूतेंही त्यातच बीजरूपाने रहातात. नि: मेष, कल्प इत्यादि सर्व न्यूनाधिक काल-परिमाणास यानेच झाकून टाकिलें आहे. पण याप्रमाणे हा आत्मा जगात स्थित असूनही कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादिकाचा लेप त्याला होत नाही. कारण तो उदासीनाप्रमाणे असतो. जग हा एक मोठा चमत्कार आहे. पण त्याला कोणी केव्हाही केले नाही व ते कधीं लीनही होत नाही. मग असे जर आहे तर वेदांत- शास्त्रात दृश्याचे खडन का केलेलें असतें ह्मणून ह्मणशील तर सागतो. व्यावहारिक युक्तींच्या दृष्टीने ते त्याचे खडन केले आहे. पारमार्थिक दृष्टीने