पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९१ बृहयोगवासिष्ठसार. या धर्मानेही रहित, निर्विकार व त्रिकाल सत्य असें जें तत्व तेच हे सर्व आहे ८०. सर्ग ८१-या सर्गात मंत्र्याने, राजाचा अधिकारही तिला समजावा ह्मणून, मुद्दाम राखून ठेविलेल्या प्रश्नाचे उत्तर राजा देत आहे. राक्षसी-भो मत्रिन्, तुझी बुद्धि फार सूक्ष्म आहे व तुझी उक्ति परम पवित्र आहे. आता राहिलेल्या प्रश्नाची उत्तरे हा राजा देऊ दे. राजा-जगाच्या अनुभवाचा ज्ञानाने अभाव होणे, हाच ज्याचा उत्कृष्ट अनुभव आहे, मनापासून सर्व सकल्प-त्याग केल्यामुळेच ज्याचा साक्षात्कार होतो, ज्याचा सकोच व विकास याच्या योगानें क्रमानें जगाचा प्रलय व उद्भव होतात, वेदांतवाक्याची जी परमावधि, जो वाणीचा अविषय, जें अस्ति-नास्ति, भाति-न भाति इत्यादि दोन्ही कोटींच्या अतराली रहाणारे झणजे अनिर्वचनीय आहे; हे चराचर जगही ज्याच्या चित्ताची लीला आहे, व विश्वरूप असूनही ज्याची अखडता खडित होत नाही त्या सन्मात्र शाश्वत ब्रह्माविषयी तू प्रश्न विचारीत आहेस. हा ब्रह्माणु आपल्यामध्येच वायूची कल्पना करीत असल्यामुळे वायु आहे व शब्दकल्पना करीत असल्यामुळे शब्द आहे, पण वस्तुतः तो वायुही नाही व शब्दही नाही. तोच हे सर्व आहे व तो काही नाही. तोच अह आहे व तोच नाह आहे. ह्मणजे सर्व शक्तिसपन्न आत्म्याची प्रतिभाच या सर्व सत्यासत्य पदार्थाच्या प्रतिभानाचे कारण आहे. हा आत्माच शेकडों यत्नानी प्राप्त करून घेण्यास योग्य आहे; पण तो एकदां प्राप्त झाला झणजे मग त्याच्याहून अधिक काही नाही. अज्ञानरूपी मूळास तोडून टाकणारे बोधशस्त्र मिळेपर्यतच जन्मरूपी वसंतऋतूत दीर्घकाल संसार- वेल वाढत असते. हा चिदणुच मेरूस आपल्या उदरांत सांठवितो व त्रिभुवनास तृणतुल्य करून सोडितो या अणूत जें स्फुरतें तेंच बाहेर दिसते. आदि सर्गात प्रवृत्त झालेली सर्व शक्तिरूप नियतिच या सर्व नियमाचे कारण आहे, आणि त्यामुळे व्यक्त झालेल्या चित्तांत जे जसें स्फुरते, ते तसेच बाहेर दिसते. हा अणु सर्वग, अनादि, अरूप व निराकार असल्यामुळे शेंकडों योजनातही मावत नाही. धूर्त व कामी जार नेत्राच्या मनोहर कटाक्षानी साध्याभोळ्या स्त्रियांचे मन जसे आकर्षण करून घेतात त्याप्रमाणे हा आत्मा आपल्या शुद्ध ज्ञानाच्या योगाने