पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० बृहद्योगवासिष्ठसार. होणान्या आत्म्यापासूनच प्रवृत्त झाली आहे. गाढ अधकारात असलेल्या पुरु- षासही बाहेरच्या प्रकाशकावाचून,हा मी येथे आहे,असे स्पष्टपणे समजत असते. त्याचप्रमाणे हृदयात स्फुरण पावणाऱ्या सर्व चमत्कृति त्या नित्य प्रकाशामुळेच अनुभवास येत असतात. लता, वृक्ष, अकुर इत्यादिकाच्या वृद्धीचे नि- मित्त हाच आहे. तो वेदनाकार प्रकाश स्वानुभवसिद्ध आहे काल, आकाश, क्रिया, सत्ता, स्वामी, भोक्ता, कर्ता, पिता इत्यादि सर्व जगत् व्यवहार-दृष्टीने त्याच वेदनात आहे. पण परमार्थ-दृष्टीने हे सर्व आत्मा आहे. आपल्या अणुत्वास न सोडताच तो या जगदपी रत्नांचा करडा झाला आहे. केवल चेतनामध्ये माता, मान, मेय, इत्यादि त्रिपुटीरूप जग नाही. पण तोच आपल्या विचित्र माया शक्तीने हे सर्व जग निर्माण करून त्यात करड्यातील मण्याप्रमाणे एक सारखा चमकत रहातो. तो अणु दुर्बोध असल्यामुळे त्यास तम, व चिन्मात्र असल्यामुळे प्रकाश ह्मणतात. तो अनुभवरूप असल्यामुळे ' अस्ति' व इद्रियातीत असल्या- मुळे 'नास्ति' असा भास होतो. इद्रियास गोचर न झाल्यामुळेच तो दूर आहे, असे ह्मणतात व चिद्रप असल्यामुळेच तो अगदीं समीप आहे, असे ह्मणाव लागते. इद्रियादिकावाचून " मी, मी" असा त्याचा अनुभव येत असल्यामुळे तो अणुही समोरन्या महागिरीप्रमाणे अति स्पष्ट आहे. या जगातील जे जे काही भासतें ते ते सर्व त्या अणूच्या केवल सवेदनरूप आहे. भासणारे पर्वतादिक सत्य नाहीत. यास्तव या अणूमध्येच मेरुता साठविलेली आहे. निमष, कल्प इत्यादि सर्व कल्पना आहेत व त्या सर्वाचा आधार हा चैतन्य अणुच आहे ज्या अणूत अनत निमेष, असख्य कल्प, अनेक सृष्टी व त्यातील पदार्थ भरून राहिले आहेत त्यात द्वैत किवा अद्वैत याचा थाग कसा लागणार ? मी पूर्वी असे केले, त्यानतर हे केले, पुढे असे करावे लागले इत्यादि सत्य व असत्य अनेक कल्पना एका क्षणात चित्तात उद्भवतात. दुःखात काल लाबतो व सुखाचे वेळी तो केव्हा जातो हे समजतही नाही. चित्तात सत्य किंवा असत्य असा जो निश्चय उत्पन्न होतो तोच चैतन्यात व्यक्त होतो, असा नियम आहे. तस्मात् वस्तुत निमेष नाही, कल्प नाहीं, दूर नाहीं; अदूर नाही; तर ही सर्व त्या चिदणूचीच प्रतिभा आहे व प्रकाश-तम, दूर-अदूर, क्षण-कल्प इत्यादिकाप्रमाणेच इतर सर्व विरोधी पदार्थाचेही एकचित्च