पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ८०. १८९ तोच जगत्कोश आहे. चित्तरूपी महासागरांत त्रिजगत्-रूपी अनेक लाटा उठत असतात. चिदणु चित्त व इद्रियें यांस अलभ्य आहे. त्यामुळे तो शून्य असल्यासारखा वाटतो. पण आपल्याच अनुभवरूप ज्ञानाच्या योगानें लभ्य असल्यामुळे दिक्कालादिकानी मयोदित न होणारा तो अशून्य आहे. मी अद्वैत दर्शनामुळे तो आत्माच होऊन सवे शरीरात रहात असतो. यास्तव मी तू व तू मीच आहे. पण मी, तू इत्यादि हा सर्व व्यवहार आहे. परमार्थतः मीही नाही व तूही नाहीस. लोकसमूहाच्या अतर्भागी असणारा हा त्याच्याबरोबर जात येत असल्यासारखा जरी वाटला तरी स्वतः सर्वव्यापी असल्यामुळे कोठेही जात नाही. स्वप्नाप्रमाणे, कल्पनेने ह्या अणूमध्ये असख्य योजनेंही रहातात. त्याचे उभे असणे अथवा जाणे हे शरीररूपी उपाधीच्या अधीन असून वस्तुतः तो जात नाही; उभा असत नाही, व कोठे पोंचतही नाही. कारण मर्यादित वस्तू- मध्ये या सर्व क्रिया असू शकतात. अमर्याद आत्म्यामध्ये त्यातील काही असू शकत नाही. कारण देश व काल यास तो आपल्या सत्तेमध्ये साठवितो. शिवाय जेथे जाऊन पोचावयाचे ते जर आपल्या शरीरात असले तर कोण कोठे जाणार ? स्तन पीत असलेल्या बाळकाला माता, ते कोठे आहे, ह्मणून कधी हुडकू लागते का? तस्मात् व्यापी आकाश घटाबरोबर घटाकाशरूपाने जसें जातें-येतेसे वाटते तसाच तो चिदणु शरीराबरोबर जात येत असल्याचा भास होतो. जडदेहादिकाचे ठायीं चेतन आत्म्याचा अध्यास केल्यामुळे प्रकाश-स्वभावता व जडता यांचा अनुभव येतो. आदि-अतरहित अशा या चिदाकाशांत चिन्मानं परमात्मा त्रिजग- द्रुपी विचित्र चित्र काढितो. आत्मसत्तेनेच अग्नि सत्तावान्' झाला आहे. सर्व जगांतील द्रव्यांस पावन करणारा तो सर्वव्यापी असूनही अग्नी- प्रमाणे कोणास जाळीत नाही. प्रकाशरूप, भास्वर, आकाशाहूनही निर्मल अशा त्या परमतेजापासूनच वह्नि उत्पन्न होतो ज्ञानान्या योगानें तो सूर्यादि प्रकाशमय गोलासही प्रकाशित करितो व आत्म- चैतन्यरूप असा तो सूर्य महाकल्परूपी मेघांनीही नाहीसा होत नाही तो नेत्रांस अलभ्य आहे. अनुभव हेच त्याचे रूप आहे. तो हृदयगहातील दीप आहे. सर्वास सत्ता देणारा, अनंत व परम प्रकाश असें त्यास मटले आहे. 'मी' ही भावना मन व ज्ञानेंद्रिये याच्या पलीकडे असलेल्या व यांस गोचर न