पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८८ बृहद्योगवासिष्ठसार उत्तरही दिल्या सारखें झालें आहे.) सर्व वस्तूंची सत्ता अनुभवसत्तेच्या अधीन आहे. तस्मात् ती सत्ताच मुख्य असून तिच्या योगाने इतर सर्व वस्तु सत्तायुक्त झाल्या आहेत. ते परमात्मतत्त्वच बाह्यदृष्टीने पाहिल्यास आकाश (शून्य) व सर्व भूताच्या आत रहाणान्या चैतन्याच्या दृष्टीने पाहिल्यास अना- काश (अशून्य) आहे. ते तत्त्व अतींद्रिय असल्यामुळे झणजे इद्रिय-गोचर होणारे नसल्यामुळे स्थूलबुद्धि लोकास काही नाही, असे वाटत असते व तोच अनत परमाणु होय. तो सर्वात्मक असल्यामुळे साक्षात्कार झाला असता विद्वानास आत्म्याहून भिन्न असे काही वाटत नाही व ते काय आहे हेही सागता येत नाही. यास्तव विद्वानाच्या दृष्टीने काहींसें हा आत्माच आहे. पहिल्या प्रश्नात उपाधीच्या योगाने ज्याचे अनत भेद झाले आहेत, असें तू मटले आहेस. पण ती चिदणूची अनेकता सोन्याच्या कटकतेप्रमाणे असत्य आहे. वास्तवीक नव्हे. त्याचप्रमाणे तुझ्या प्रश्नात पुष्कळ वेळा अणु हा शब्द आला आहे. त्याचा अर्थही परम आकाश (आत्माच) आहे. व तो अति सूक्ष्म आणि सर्वांतर्यामी असल्यामुळे सहज अनुभवास येत नाही. पाच ज्ञानेंद्रियें व सहावें मन याच्या पलीकडे असलेला हाच सर्वाचा आत्मा आहे. तो सर्वाचा आत्मा असल्यामुळेच तो केव्हाही शून्य नाही. एकादे तत्त्व आहे किंवा नाही इत्यादि सागणारा व समजणारा तो आत्मच होय. यास्तव आपल्या आत्म्याचाच अपलाप करून 'तो नाही' असें ह्मणणे अयोग्य आहे. सत् वस्तूस असत् ह्मणणे हे कोणत्याही युक्तीने जमत नाही. तर मग तो इतर वस्तूप्रमाणे दिसत का नाही ? ह्मणून विचारशील तर सागतों तो निराकार व सूक्ष्म असल्यामुळे आपल्या शुद्ध स्वरूपाने जरी न दिसला तरी झाकून ठेविलेला कापूर किंवा कस्तुरी याचे अस्तित्व वासावरून जसे सिद्ध होते त्याप्रमाणे सर्व प्राण्याच्या चेष्टावरून व अनुभवावरून त्याच्या सामान्य सत्तेचे भान होते. जो सर्व आहे व काहीही नाही असा कोण ' ह्मणून तू विचारले आहेस. त्याचे उत्तर सागतो. तो चिन्मात्र-अणुच हे सर्व आहे. मन व इद्रिये याच्या वृत्तीमुळेच नानात्मतेचा प्रत्यय येत असतो व त्यामुळे हे सर्व किंचित् या नांवास पात्र झाले आहे. पण चैतन्याणु मन, इंद्रिये याच्या वृत्तींनी पारच्छिन्न होणारा नसल्यामुळे तोच 'न किंचित् (म. कांही नाही) आहे. तोच एक व अनेक आहे. तोच या सर्व जगास धारण करितो.