पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ८०. ३८७ दिशा, काल इत्यादिकांनी मर्यादित न झालेल्या, एक व सूक्ष्म अशा कोणत्या सत-हून हे द्वैत निराळे नाही? द्रष्टा, दर्शन, दृश्य, सत्, असत, जगत्-त्रय इत्यादि सर्वे करून त्रिकालातीत व अकर्ता कोण आहे ? भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाली होणारा जगाचा समूह, बीजवृक्षन्यायाने, कशात रहातो? बीजापासून वृक्ष होतो व वृक्षापासून पुन• बीजे उद्भवतात असे आपण पहातों. पण एक व विकारशून्य अशा कोणापासून हे सर्व जग निर्माण होते ? हे राजा, ज्याच्या दृढतेपुढे महामेरु कमलाच्या देंठांतील सूक्ष्म तंतूप्रमाणे निर्बल ठरतो अशा कोणाच्या उदरात असख्य ब्रह्मांडें रहात असतात ? साराश हे राजा, अनेक चेतनांनी युक्त असलेले हे विश्व कोणी रचिलें ? तू कोणत्या सारभूत तत्त्वाचा आश्रय करून सर्व व्यवहार करितोस? व तुझे स्वरूप काय आहे, ते मला साग. माझ्या या प्रश्नांची उत्तरे देऊन जर तू माझ्या सशयाचे निरसन केलेंस तरच तू पंडित आहेस व खरा राजा आहेस, असें मी समजेन. पण तुझा दोघांपैकी कोणीही जर माझ्या या प्रश्नाची समाधानकारक उत्तरें न देईल तर मी तुझास आपल्या उदरात साठविल्यावाचून रहाणार नाही. अगोदर तुमच्या शरीरानी जठराग्नीस तृप्त करून नतर तुमच्या प्रजेसही मी गट्ट करून सोडीन ७९. सर्ग ८०-या सर्गात अगोदर मंत्र्याने राक्षसीच्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म युक्तिपूर्वक दिली आहेत. पण उत्तराचा क्रम प्रश्नाच्या क्रमास धरूनच नाही. तर तो यथासंभव आहे. श्रीवसिष्ठ-दाशरथे, याप्रमाणे महारात्री त्या महा अरण्यांत महाराक्षसीने महा प्रश्न विचारले असतां महा मत्री त्याची उत्तरे देण्यास उद्युक्त झाला. ___ मंत्री-राक्षसि, मी आता तुझ्या या उत्तम प्रश्नाची सयुक्तिक उत्तरे देऊन तुझें सामाधान करितो. या सर्व निरनिराळ्या प्रश्नाच्या मिषाने मोठ्या युक्तीने व चातुर्याने तू परमात्म्याविषयींच विचारीत आहेस. ज्याचे शब्दानीं वर्णन करिता येत नाही व जो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही असा ज्ञानेंद्रियें व मन याचा आधार आत्मा केवळ चैतन्यरूप असून तोच आकाशाहूनही सूक्ष्म अणु आहे. चैतन्यरूप परम-अणूमध्ये बीजात जशी अनिर्वचनीय वृक्षसत्ता असते त्याप्रमाणे लक्षावधि जगाची स्थिति होते. (या उत्तराने कोणत्या अणूमध्ये जग रहातात या प्रश्नाचें