पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार पूर्णपणे प्राप्त न होणारे काय ? आपल्या आत्म्याचाच नाश कोणी केला आहे ? कोणता अणु मेरूस आपल्या उदरात सांठवितो? कोणत्या तत्त्वाने त्रिभुवनास तृण करून सोडिले आहे ? कोणत्या परमाणूने शेकडों योजनें भरून सोडली आहेत ? स्वतः अणुरूप असूनही शेकडों योजनातही न मावणारा असा कोण ? कोणाच्या केवल दृष्टिक्षेपाने जगदूपी बालक नाच लागते ? कोणत्या अणूच्या पोटात पर्वताचे ढीग साठविले आहेत ? मेरूनही ज्याची आकृति अधिक स्थूल आहे अशा कोणत्या अणूनें आपलें अणुत्व सोडिले आहे 2 केसाच्या टोकाच्या शभराव्या भागाएवढा ज्याचा आकार आहे असा कोणता अणु पर्वततुल्य आहे ? प्रकाश व अधकार या दोघासही प्रकाशित करणारा दीप कोणता! सर्व अनुभव कोणाच्या आश्रयाने रहतात ? स्वतः मधुरादि रसशून्य असून रसाचा स्वाद घेणारा कोण ? सर्वाचा त्याग करणाऱ्या कोणी सर्वांचा आश्रय केला आहे ? आपल्या स्वरूपास आन्छादित करण्यास असमर्थ असलेल्या कोणी हे जग आच्छादित केले आहे ? महाप्रलयसमयी लीन झालेले जग कोणत्या अणूच्या सत्तेने तद्रूप होऊन सृष्टिसमयी पुनः जीवंतही होते ? ज्याचे अवयव उत्पन्न झालेले नाहीत अशा कोणाचा सूर्य हा नेत्र आहे ? बीजातील वृक्षाप्रमाणे अनत जगें कोणत्या अणूमध्ये रहातात : निरवयव व अव्यक्त असे तत्त्व ज्याच्या परपरेची परमावधि आहे अशी बीजें सृष्टिकाली जगद्रूपाने स्पष्ट असूनही ती सर्व कोणान्या ठायीं वस्तुतः अनुत्पन्न आहेत ? अनत काल कोणत्या सूक्ष्म तत्त्वात राहिला आहे ? कोणालाही कोणत्याही क्रियेमध्ये प्रवृत्त न करणारा असा कोण करविता आहे ? भोगसिद्धयर्थ कोणता द्रष्टा स्वतःस दृश्य करितो र बाह्य दृष्टीने दृश्यास पहात असताना, नेत्रशून्य अशा आपणा स्वत.स कोण पहातो ? ज्ञानाच्या योगाने दृश्याचा जणूकाय नाशच झाला आहे, असे पहाणान्या कोणास पुढील दृश्याचाही अनुभव येत नाही ? नेत्र जसे दृश्यास दाखवितात त्याप्रमाणे द्रष्टा ( जीव ) दर्शन (वृत्ति ) व दृश्य ( पदार्थ ) यास कोण साक्षात् प्रकट करितो. जला- हुन तरगादि जसे पृथक् नसतात त्याप्रमाणे कोणाहून हे काहीही पृथक नाही ! जलाहून तरगत्वादि जसे पृथक् त्याप्रमाणे कोणाच्या इच्छेने हे सब पृथक् झाले आहे ८ जलाहून जसे द्रवत्व निराळे माही त्याप्रमाणे