पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७९. ३८५ तुमच्या सुटकेचा उपाय आहे. मी याचक आहे, असे जरी तुझी समज- लात तरी सुद्धा मला माझ्या या प्रश्नाची उत्तरे हीच भीक पाहिजे आहे. ती तुझा दोघापैकी कोणीही जरी घातली तरी मी घेईन ७८. सर्ग ७९-या सर्गात अनात्मवेत्त्यास वज्रासारखे कठिण वाटणारे पण आत्म- ज्ञाच्या हृदयास आहाद देणारे बाहात्तर प्रश्न कर्कटीने विचारले आहेत. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, राक्षसीचे ते जरा चमत्कारिक भाषण ऐकून राजा ह्मणाला “निशाचरि, तुला काय विचारावयाचे असेल ते विचार." ते ऐकून ती असे विचारू लागली-उपाधीच्या योगाने ज्याचे असख्य भेद झाले आहेत अशा कोणत्या एका अणूमध्ये, समुद्रातील बुडबुड्याप्रमाणे, लक्षावधि ब्रह्माडे लीन होतात ? आकाश ( शून्य ) व अनाकाश (अशून्य ) काय आहे ? लोकप्रसिद्धीने काही नाही व विद्वानाच्या दृष्टीने काहीसे आहे असे काय ? मी तू झाले आहे व तू मी झाला आहेस. पण ते कशामुळे ? जात नसतानाही जाणारा कोण ? उभा नसतानाही उभा आहे, असे कोणाविषयी बोलतात : चेतन असूनही पाषाणाप्रमाणे चैतन्याचा आश्रय न होणारा असा कोण ? चिदाकाशात विचित्र कार्य करणारा कोण ? वहिभावाचा त्याग करून दाह न करणारा वहि कोण ? राजा, जो वस्तुतः वहि नाही अशा कोणापासून निरतर वह्नि उत्पन्न होतो. चद्र, सूर्य, अग्नि व तारा यातील एकही नसताना नित्य प्रकाश करणारा असा कोण ? नेत्राचा विषय न होणान्या अशा कोणापासून प्रकाश प्रवृत्त होतो. लता, वृक्ष, अकुर, जन्माध प्राणी, दुसरेही अनेक निरिंद्रय जीव याचा उत्तम प्रकाश कोण आहे ? आकाशादिकांचा जनक कोण ? सत्तेलाही सत्ता कोणापासून प्राप्त होते! जगद्पी रत्नाचा (निधि, खजिना) कोण ? कोणत्या मण्याचा जगत् हा कोश आहे ? कोणता अणु तमःप्रकाश आहे ? कोणता अणु आहे व नाही? कोणता अणु दूरही व जवळही आहे ? कोणता अणु महापर्वत आहे ? निमेष असूनही कल्प व कल्प असूनही निमेष कोण होतो ? प्रत्यक्ष असूनही असत् कोण ? व चेतन असूनही अचेतन कोण ? अवायु असून वायु कोण ? शब्दरहित शब्द कोण ? सर्व कोण ? न किंचित् कोण ? अह व नाह कोण ८ पूर्वी अनेक जन्मामध्ये आत्मरूपाने प्राप्त असूनही अज्ञानाने आवृत झाल्यामुळे शेकडो प्रयत्नानी प्राप्त करून घेण्यास योग्य काय आहे ?