पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ बृहद्योगवासिष्ठसार. सामान्य पुरुष आहेत, असे समजणे झणजे मोठाच प्रमाद करणे होय. मी हा एक आज मोठा चमत्कारच पाहिला. याचे वचन, मुख व नेत्र यांवरून याच्या मनातील निश्चय व्यक्त होत आहे. कारण सुज्ञांचा आशय व्यक्त करणारी ही तीन द्वारेच आहेत. बहुतकरून माझा अभिप्राय यांस कळला असावा. यास्तव स्वतः अविनाशी असलेल्या यांना मारणे उचित नाही, हे आत्मज्ञ असावेत. कारण अनात्मज्ञांस अशी मति नसते. जीवन व मरण हे मिथ्याभाव आहेत, असे कळल्यावांचून मृत्यूविषयी कोणालाही निर्भय होतां येत नाही. असो; तर आतां मला आलेला संशय मी यांस विचारते. कारण ज्ञानी पुरुषाचा समागम झाला असता त्यांस जे आपल्या सशयनिवृत्यर्थ प्रश्न करीत नाहीत ते मूर्ख होत. असा विचार करून व आपलें तें हसणे आवरून ती त्यास ह्मणाली, "तुझी दोघे कोण अहां तुमचे धैर्य व पुण्यप्रभाव याचा प्रत्यय तुमच्या चर्येवरूनच येत आहे, ज्याचे चित्त शुद्ध असते अशा पुरुषाची मैत्री प्रथमदर्शनीच होते, असा नियम अस. ल्यामुळे मी मित्रभावाने हा तुझास प्रश्न करीत आहे. ते ऐकून मत्री ह्मणाला, "हा महापुरुष किराताचा राजा आहे व मी त्याचा मत्री आहे. प्रजा- जनास विनाकारण त्रास देणाऱ्या तुजसारख्या दुष्टाचा निग्रह करण्याकरिता आही या काळोख्या रात्री बाहेर पडलो आहो. दुष्ट प्राण्याचा अहोरात्र निग्रह करणे हेच राजाचे कर्म आहे व तें जो करीत नाहीं तो राजा लवकरच नाश पावतो. "हे मत्र्याचे भाषण ऐकून राक्षसी ह्मणते, "राजन् , तुझा मत्री दुष्ट आहे. पण चांगल्या राजाचा चागलाच मत्री असणे उचित होय. चागल्या मत्र्याचे पहिले कर्तव्य राजास विवेक शिकविणे हे आहे. कारण विवे. काच्या योगाने राजा आर्यत्वास प्राप्त होतो व जसा राजा तशी प्रजाही होते. सर्व गुणसमूहात अध्यात्मज्ञान उत्तम आहे. ते ज्यास असते तोच खरा राजा व तें ज्यास असेल तोच खरा मत्री होय. अध्यात्मविद्येच्या योगानें प्रभुत्व प्राप्त होते. प्रभुत्व ह्मणजे समदृष्टित्व. ( सर्व भूतांमध्ये सम ब्रह्म पहाणे ) व त्या विद्येच्या अभावी ते दोघेही ( राजा व मत्री) नाम- धारक होतात. यास्तव तुझी दोघे जर आत्मज्ञ असला तरच आज येथून जीवंत परत जाल व तसे नसाल तर आपल्या मूर्खतेने प्रजेस मूर्ख कर- णान्या तुझांस मी आतां भक्षण केल्यावांचून रहाणार नाही. बाळांनों, मी जे आता प्रश्न करीतः आहे त्यांची बरोबर उत्तरे देणे हाच एक