पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८२ बृहद्योगवासिष्ठसार. असतो. गणी महात्म्यास तर मी खाणार नाही. स्वाभाविक सुख, कीर्ति व आयुष्य, याची इच्छा करणाऱ्या मानवाने आपणास इष्ट असलेल्या सर्व वस्तूच्या दानाने गुणी पुरुषाचा सन्मान करावा, असें ज्ञानी सागतात. यास्तव माझा हा देह मरून पडला तरी चालेल पण मी गुणी प्राण्यास खाणार नाही. जीवित-दानानेही गुणी पुरुषाचे परिपालन करणे उचित होय. कारण त्याच्या समागमाने मृत्यूही मित्र होतो. मी राक्षसी आहे. पण माझ्याही मनांत ज्याअर्थी गुणी पुरुषाविषयी इतके प्रेम आहे त्याअर्थी तो प्राणिमात्रास प्रिय असावा यांत मुळीच संशय नाही. गुणी प्राणी या लोकची भूषणे आहेत. त्याचा तिरस्कार करणे हेच मरण व त्याचा समागम करणे हेच जीवित आहे. कारण गुणि-समागमरूप जीविता- पासून स्वर्ग, मोक्ष इत्यादि उत्तमोत्तम फळे उत्पन्न होतात. असो, तर आता अगोदर मी यास काही प्रश्न करून याचे परीक्षण करिते. प्रश्नो- त्तरावरून त्याचे ज्ञान किती आहे, हे तेव्हाच समजेल ७७. सर्ग ७८-कर्कटीचे भयंकर भाषण, पण त्यास न भ्यालेल्या राजास तिचे दर्शन व मंत्र्याच्या वाक्याने समाधान पावलेल्या तिचा प्रश्नारंभ. यांचें या सर्गात वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, त्या राक्षसीने जरी त्याना पाहिले होते तरी त्यांनी त्या गाढ अधःकारात असलेल्या व गुप्तपणे सचार करणान्या तिला पाहिले नव्हते. ते उद्दिष्ट मदिराकडे चालले असता ती एकाएकी मोठ्याने ओरडली व त्या मेघगर्जनेसारख्या भयकर गर्जनेनतर त्यास ह्मणाली, " अरे सुकुमार व अति सूक्ष्म मानवानो, तुह्मी कोठे जाता व कोण आहा तुझी दिसण्यात तर मोठे बुद्धिमान् दिसता पण या वेळी अशा भयकर स्थानी येऊन माझ्या भक्ष्यस्थानी का पडला ? " रामा, तिचे हे घोर भाषण ऐकून राजा उलट ह्मणाला, " अरे क्षुद्र भूता, तू कोठे आहेस ? तुझे शरीर कोठे आहे तें तर मला पाहू दे घुघुरट्यासारिख्या तुझ्या या आक्रोशास कोण भिते आहे ? तुझ्या सारख्या दुष्टाच्या चेष्टा आमच्यापुढे फारशा चालणार नाहीत. यास्तव तुझ्या ठायी काय सामर्थ्य आहे ते दाखीव. व्यर्थ बडबड करण्यात काही अर्थ नाही तुला काय हवे आहे ते साग. मी तुला काय देऊ ? कोप व आक्रोश न करिता व न भीता स्पष्ट बोल, आपल्या प्रकट होण्याच्या