पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ बृहद्योगवासिष्ठसार. ही अवस्था निर्माण केली आहे, शातीकरिता नव्हे, असे मनात येते. पण महर्षे, " बाल्यावस्थेसारिखें सुख नाही " असे सासारिक चिंतेने सतप्त झालेले काही लोक म्हणत असतात ! ते ऐकून मला त्याच्या अज्ञा- नाचे हसू येते. आपल्या अवस्थेशी तूलना करून पहाताना त्यास बाल्यावस्थेत सांसारिक चिता कमी असते व त्या मानाने उद्योगही बेता- चाच करावा लागतो, असे आढळते व तेवढ्यावरूनच ते त्या अवस्थेस मुखकर समजतात. पण अन्नवस्त्रादिकाची जरी फारशी चिता नसली तरी तेव्ड्यावरून चिंतेची व दुःखाची इतर कारणे नसतातच, असे म्हणता येत नाही. कारण सुखाचे मुख्य साधन समाधान आहे. पण चचलवृत्तीत त्याचा उदय होत नाही. बाल्यावस्थेत प्राण्याची चित्तवृत्ति दुसऱ्या कोणत्याही अवस्थेहून अधिक चचल असते, हे कोणीही मान्य करील. तेव्हा अशा स्थितीत सुख असते, असे म्हणणे युक्त नव्हे. बरें बाल्यावस्था आरभी जरी दुःखकर असली तरी ती उत्तरोत्तर मुखकर होत जाते, असे म्हणावे तर तेही बरोबर नाही. कारण बालक चार-पाच वर्षाचा झाला म्हणजे त्यास चालता, बोलता व आपले दुःख सागता येते व तो पूर्वीप्रमाणेच अति परतत्र नसतो, हे जरी खरे आहे. तरी दुसऱ्या चिता त्याच्या बोकाडी बसतात. त्याला गुरुगृही जाऊन विद्या शिकावी लागते. ती न आल्यास गुरुजी ताडण करितात. शाळेंत न गेल्यास माता, पिता, बधु व इतर जन रागावतात. खेळण्याकडे मनाचा ओढा फार असतो. पण त्यावेळी वैयाप्रमाणे वाटणारी आईबापे मनमुराद खेळू देत नाहीत. त्यामुळे त्यास असह्य क्लेश होतात. वडिल माणसास काही तरी सागून मार चुकवावा लागतो. पण खोटे बोलण्याचे पाप मनास कपायमान केल्यावाचून रहात नाही. देव योगाने एकाद्याची बुद्धि चागली असली तर त्याला चागला गुरु भेटत नाहीं; गुरु भेटला तर पालक पिता अल्पायु होतो, किवा तो वालकच व्याधिग्रस्त होतो. साराश कुमारावस्थाही बाल्या-इतकीच कटकर आहे १९. सर्ग २०-लोभ, द्वेप, मद, असूया, मान व मात्सर्य यानी दूषित व कामादि अन- थीच गृह अशा तारुण्याची येथे निंदा केलेली आहे. ___पुढ या भयकर प्रतिकूलतेशी व कालाशी झगटता झगडता प्राणी तारुण्य-अवस्थेस पोचतो. तारुण्याचा मद अनिवार्य असतो. तो अनेक