पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७७. रममाण होऊ लागले असता, काही मद्यपी मद्यपानाने मत्त होऊन यथेच्छ लीला करून थकून भागून शय्येवर पडले असतां व चोर, जा चेटकी, नाटकी, इत्यादि दुराचरणी लोक आपापल्या इष्ट कार्यास तत्प झाले असतां ककेटीलाही त्या सवे ग्रामाचे सावकाश व सूक्ष्मपणे निरीक्षा करण्यास चांगलें फावलें. मध्यरात्रीच्या सुमारास तर निशाचर व निशा चराचे कर्म करणारे काही थोडे मानव यावाचून त्या प्रामाच्या मार्गात कोणीही जात येत नव्हते. पर्वताच्या पायथ्याशीच असलेल्या त्या मा माच्या चारी बाजूस भयकर अरण्य होते. त्यांतून मधून मधून हिंस्र पशूच्य गर्जना ऐकू येत. केव्हा केव्हां तर व्याघ्रादिकांच्या भक्ष्यस्थानी पडलेल्य मृगादि दुर्बळ प्राण्याचे आक्रोशही कानी पडत. पक्षी आपल्या घरव्यांत गपचीप बसून झोप घेत होते. गायी, बैल, मशी, रेडे, घोडे इत्यादि ग्राम्य पशु मधून मधून जरी थोडी हालचाल करीत होते तरी तेही प्राय निद्रावशच झाले होते. असो, अशा त्या भयकर रात्री त्या सर्व गांवभा हिंडून ती राक्षसी गावाच्या बाहेर आली. तो तिला नगररक्षा करण्या करितां भर मध्यरात्री निघालेला त्या ग्रामाचा राजा व मंत्री दिसला. दोघे सशस्त्र व धैर्ययुक्त वीर गांवाबाहेरील मारुतीच्या दर्शनाकरित जात होते. त्यांस पहाताच ती मनात ह्मणाली-बरे झाले. मला हा आता फार चागला आहार मिळाला आहे. मध्यरात्री गावाबाहेर फिरणारे हे दो मूढ व अनात्मज्ञ असावेत. याचा देह हा त्यांच्यावर लादलेला भारच आहे, असे वाटते. कारण मूढ पुरुष या लोकीं व परलोकीही केवल दःख भोगण्याकरिताच जीवत रहात असतो. यास्तव अशा मुखीस देहापासून सोडविण्यात काही पाप नाही. कारण अनर्थकारक वस्त, परिपालन करावे, असे कोठेही सागितलेले नाही. आपल्या प्रत्यगात्म्यास न जाणाणाऱ्या मूर्खाचे मरण झणजे जीवितच होय. (कारण त्याच्या जिण्याइन मरणच अधिक श्रेयस्कर असते.) तस्मात् हे दोघे आज माझें भक्ष्य होणार, यांत सशय नाही. अनायासाने प्राप्त झालेली दोष- रहित वस्तु टाकून देणे हा मोठा अन्याय आहे. दुर्दैव्यावांचून दुसरा कोणीही असे करणार नाही. पण यांना खाण्यापूर्वी हे सद्गुणी आहेत की काय, याचा चांगला निर्णय केला पाहिजे. कारण केवल भनुमानानेच एकादा सिद्धांत ठरविल्यास तो अनुभवाने मिथ्या होण्याचाही फार संभव