पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८. बृहद्योगवासिष्ठसार. हे भाषण ऐकून “बरें आहे. वायुदेवा, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करिते. तू मजवर हा मोठाच अनुग्रह केला आहेस." असें बोलून ती उठली व हळु हळु त्या शिखरावरून खाली उतरून, त्या पर्वताच्या सपार्टीचे उल्लघन केल्यावर काही वेळाने ती ज्ञानी स्त्री त्याच्या पायथ्याशी येऊन पोचली. तेथें किरातांचा एक ग्राम होता. तो क्षेत्रफळाच्या मानाने जरी फार मोठा नव्हता, तरी त्यांतील जन फार कष्ट करणारे असल्यामुळे विपुल अन्न, पशु, मनुष्ये, द्रव्य, कोमल तृण, औषधि, मांस, मुळे, फळे, पक्षी, कीट इत्यादिकांची तेथें समृद्धि होती. त्या रमणीय प्रामात चालत्या बोलत्या भजन पर्वताप्रमाणे असलेली ती राक्षसी शिरली ७६. सर्ग-७७. या सर्गात काळोखी रात्र, राक्षसीस झालेले राजा व मंत्री यांचे दर्शन व ते गुणी आहेत की मूढ आहेत हे जाणण्याकरितां त्यांस प्रश्न करण्याचा कर्कटीने केलेला निश्चय याचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-पण, बा कौसल्यानदना, ती राक्षसी ग्रामात शिरत आहे तों रात्र पडली. त्यावेळी शुक्लपक्ष असल्यामुळे, अतरिक्षात चद्रमा सर्व भूलोकावर उपकार करण्याच्या उद्देशानेच जरी उगवला होता तरी दुर्जना- प्रमाणे ज्यांचा अतर्भाग काळाकुट्ट आहे अशा मेघानी अंतरिक्षास चोहों- कडून व्यापिल्यामुळे त्याचा एकादा सूक्ष्म किरणही पृथ्वीपर्यत येत नव्हता. ज्ञानाच्या अभावी जसा अज्ञानाचा निष्प्रतिबध अधिकार चालतो त्याप्र- माणेच प्रकाशाच्या अभावी अप्रकाशाचाच झणजे अंधकाराचाच सर्वत्र प्रादुर्भाव होणे अगदी साहजिक होते. तात्पर्य त्या ग्रामात क्षणोक्षणी अधकार वाढू लागला. नील वर्ण आकाशात संध्याकाळी जसें एकाद-दुसरें नक्षत्र चमकत आहेसें दिसावे त्याप्रमाणे त्या ग्रामात कचित् दीपज्योती दिसत होत्या. प्रामस्थांच्या घरातून दिवे लावलेले होते; पण कृपणाच्या द्रव्याचा जसा दुसऱ्या कोणाला कधी उपयोग होत नाही त्याप्रमाणे त्यांचा प्रकाश बाहेर येत नसल्यामुळे ते मार्गाने जाणान्या येणाऱ्या लोकांच्या निरुपयोगी होते. जशी जशी रात्र व काळोख वाढू लागला तसा तसा लोकांचा व्यवहार कमी झाला व चित्ताचा विक्षेप कमी झाला असता जसा शांतीचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे त्या प्रामांत चोहोकडे सामसूम झाले. लोकांचा बाहेरील सुळसुळाट कमी होऊन त्यांतील बरेच निश्चित लोक निद्रावश झाले असतां, काही विलासी तरुणींसह