पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७६. जठराग्नीचा ताप दुसन्या सर्व तापाहून असह्य असतो व त्याच्या शाती- करिता प्राणी काय हवे ते करण्यास कसा उद्युक्त होतो हे सर्व शरीर धारण करणारास ठाऊक आहेच सहा महिन्यात ज्याची एकदाही तृप्ति झाली नव्हती त्या कर्कटीच्या जठराग्नीने तिला किती क्लेश देण्यास आरभ केला असेल याची नुस्ती कल्पनाच केली पाहिजे. (कारण कलियुगात अन्नमय प्राण असल्यामुळे सहा महिने काही न खाता रहाणे, आमास शक्य नाही. यास्तव या साराच्या लेखकास व वाचकास त्याविषयी कल्पना करण्यावाचून गत्यतर नाही. असो,) पण ज्ञानाचे शैत्य इतके प्रभावशाली आहे की, ते असल्या शेकडो सतापां- नाही सह्य करिते, असा नियम आहे. त्याप्रमाणे कर्कटीनेही त्या जठ- नीच्या तापास ज्ञानशैत्याने शात करून असा विचार केला.-एकाद्या जीवास खाल्यावाचून या जठराग्नीची तृप्ति होणे शक्य नाही. पण तसे करणे न्याय्य आहे का ? महात्मे लोक ज्याची निंदा करितात व जे न्यायाने सपादन केलेले नाही ते खाऊन प्राण वाचविण्यापेक्षा जठराग्नीत त्याचीच आहुति देणे काय वाईट ? न्यायाने ग्रास न मिळाल्यामुळे जर माझा हा विशाल देह जड होऊन पडला तर त्यात कोणता अन्याय आहे ? पण न्यायाने मिळविलेल्या ग्रासावर निर्वाह केल्यास तो पास विषाप्रमाणे अनर्थ करील. तस्मात् शिष्टास मान्य नसलेल्या उपायाने क्षुधेचे निवा- रण करणे उचित नव्हे. मला जीवित व मरण यातील कशाचीही अपेक्षा नाही. कारण ते देहाच्या अपेक्षेने होणारे भ्रम आहेत, हे मी पूर्णपणे। जाणले आहे. ज्ञानाच्या योगाने माझ्या मनाचे सर्व सकल्प आता क्षीण झाले आहेत. ते आता अत्यत शात होऊन राहिले आहेत व त्यामुळे देह व अदेह किंवा जीवित व मरण याचे भान मला होत नाही. राघवा, असा विचार करून ती ज्ञानी राक्षसी शात चित्ताने क्षुधेस सहन करण्याचा निश्चय करून तेथेच राहिली. तेव्हा तिने आपल्या राक्षसी देहावरील अभिमान सोडून दिला आहे, असे पाहून सतुष्ट झालेला वायु तिला मणाला “हे कर्कटि, तू आता येथून उठ व लोकामध्ये मिळसून अज्ञांस सत्वर बोध कर. कारण मूढांचा उद्धार करणे, हेच महात्म्यांचे शील असते. पण तू बोध केल्यावरही जो त्याचा अगीकार करणार नाही तो मूर्ख आपला नाश करून घेण्याकरितांच उत्पन्न झाला आहे, असें ढूं जाण व तो तुझा न्याय्य ग्रास आहे, असे समजून तूं त्यास खा." वायूचें