पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७८ बृहद्योगवासिष्ठसार. तू जरी सहज बाह्यवृत्ति झालीस तरी तुला सर्वत्र आत्मध्यानच घडेल. तू आपल्या क्षुधेची बाधा नाहीशी करण्याकरिताही अन्यायाचरण करणार नाहीस. लोकांतील अन्यायास नाहीसे करून तू आपल्या प्रमाणे इतरासही न्यायवृत्ति करिशील व केवल विवेकप्रधान होऊन तू आपल्या नवद्वारयुक्त देहसज्ञक नगरात काहीएक न करिता व न करविता राहशील. झणजेच जीवन्मुक्त होशील. असें बोलून तो देव आकाशमार्गाने गेला. इकडे ती राक्षसीही " बरे आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे का होईना. माझें त्यांत काय जातें ? " असे ह्मणाली. त्यानतर ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे तिच्या मनात भावी देहाची कल्पना उद्भवली व तिच्या अनुरोधानेंच बीज-वृक्ष- न्यायाने उत्तरोत्तर वृद्धि पावता पावता तिचे शरीर हृष्ट, पुष्ट, व सर्व इद्रियें, अवयव, शक्ति इत्यादिकानी युक्त झाले ७५. सर्ग ७६-देह प्राप्त झाल्यावरही सहा महिने समाधिस्थ राहुन क्षुधित झालेली कर्कटी उटली व वायूच्या सागण्यावरून किराताच्या प्रदेशात गेली, असे या सात वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामा, लहानसा मेघ जसा अनुकूल स्थिति मिळाली असता एका घटिकेत सर्व अतरिक्षास व्यापून टाकितो त्याप्रमाणे ती सूचीच्या आकाराची कर्कटी सर्व अवयवसपन्न झाली. तिला तिचे ते पुष्ट व विशाल शरीर पुनः प्राप्त झाले. पण ज्ञानाचा प्रभावच काही विलक्षण असल्यामुळे स्थूलशरीराच्या प्राप्तीनतरही तिने ब्रह्माकाशाचेच अनुसधान केलें व ब्रह्मसाक्षात्कार दीर्घकालापासून अत्यत दृढ झालेला असल्या कारणाने तिने शरीराचा राक्षसभाव सोडिला. झणजे हे शरीरच मी आहे, असे ती समजली नाही. त्यामुळे त्या भव्य शरीराची प्राप्ति झाल्या- वरही तिला कोठे जावें व शरिरास साजेल असे काही कृत्य करावे, असें वाटले नाही. पद्मासन घालून ती तेथेच ध्यान करीत राहिली. आपल्या चित्तवृत्तास शुद्ध चैतन्यमय करून ती पर्वताच्या शिखराप्रमाणेच निश्चल होऊन तेथे राहिली. याप्रमाणे सहा महिने लोटले. त्यानतर ती एकदा देहभानावर आली. वर्षाकाळी मेघगर्जना ऐकून मयूरी जशी जागी होते त्याप्रमाणे सावध झालेल्या तिला क्षुधा लागली आहे, असे भासले. कारण देह असेपर्यत क्षुधा, तृषा, इत्यादि देहस्वभाव नाहीसे कसे होणार आपण काय खावें? ही तिला मोठी चिंता पडली.