पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७५. शुद्धचित्ताने विचार करणे यासारखें तत्त्वज्ञानाचे दुसरे कोणतेही साधन नाही निग्रहाने मननात्मक विचार करण्यास लौकिक बाह्य गुरूचीही अपेक्षा नसते ७४. सर्ग ७५.-ब्रह्मदेव प्रसन्न झाला असताही आत्मज्ञानामुळे सूची मुकाट्याने बसली. तथापि त्याने तिला वर दिला व त्यामुळे तिला शरीराची प्राप्ति झाली, असे या सर्गात सागतात. श्रीवसिष्ठ-सात सहस्र वर्षे तप केल्यावर सूचीस आत्मज्ञान झाले. त्यानतर एक सहस्र वर्षांनी पितामह तिच्याकडे आला व ह्मणाला, " हे पुत्रि वर माग." पण सूचीस कर्मेदिये नसल्यामुळे व ती केवल जीव- कलेने युक्त असल्या कारणाने काही बोलली नाही. तिने असा विचार केला-मी पूर्ण आहे. मला कोणत्याही प्रकारचा सशय नाही. तेव्हां मी आता वर कोणता मागू ? मी शात झाले आहे. मला परम आनद झाला आहे फार काय पण मी केवल सुखमय आहे. मला जे काही ज्ञातव्य होतें तें मी जाणले आहे व आता त्याविषयी सदेहही राहि- लेला नाही. माझा आत्मविवेक विकसित झाला आहे. आता मला आणखी काय पाहिजे ? मला आता आणखी कशाचेही प्रयोजन नाही. मी आता जशी आहे तशीच यापुढेही रहाणार. परमार्थरूप जी सत्य- कला तिला सोडून मला दुसरे काय सपादन करावयाचे आहे ? इतके दिवस मला अविवेकानें प्रासले होते. पण आता विवेकाच्या योगाने मी त्याच्या प्रतिबधातून मुक्त झाले आहे. तस्मात् मला कोणताही वर मागावयाचा नाही, असा विचार करून स्तब्ध बसलेल्या तिला, नियतीने बद्ध झालेला व तिचा निश्चय आणि वैराग्य पाहून प्रसन्न झालेला तो देव ह्मणाला--हे पुत्रि, तू वर मागून घे. काही काळ भूतली राहून व भोग भोगून नतर तू परमपदास प्राप्त होशील. कारण कधीही न बदलणान्या नियतीचा हा असा निश्चय आहे. यास्तव कर्कटि, ज्या उद्देशाने तू तप केलेस तो तुझा उद्देश सफल होवो. तू पुनः आपल्या स्या भयकर शरीराने युक्त हो. सूक्ष्म बीजापासून जसा मोठा वृक्ष होतो त्याप्रमाणे तुझ्या सूक्ष्म शरीरापासून स्थूल शरीर उद्भवेल. तू आतां आत्मज्ञानी झाली आहेस. यास्तव तू कोणाला पीडा देणार नाहीस. तुझें चित्त सदा शुद्ध असेल. तूं सतत ध्याननिरत असशील एकादेवेळी