पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार, श्रीवसिष्ठ-राघवा, महा भरण्याने परिवेष्टित असलेल्या त्या हिमाल- याच्या शिखरावर घोर तप करणान्या सूचीचे दर्शन वायूस सकृद्दर्शनी समाधानकारक वाटलें खरें, पण जवळ जाताच तिच्या तेजानें तो देव दीपून गेला. त्याने त्या तपोमयी देवीला साष्टांग प्रणाम केला. बराच वेळ तिच्याकडे त्याने पाहिले. तिच्याशी काही भाषण करावे, असेंही त्याच्या मनात होते. पण पुण्याच्या तेजापुढे इतर सर्व तेजें न्यून ठरतात, असा सामान्य नियम व अनुभवही असल्यामुळे तिच्या तपस्तेजानें गलितधैर्य झालेल्या वायूच्या तोंडातून एक अक्षरही निघालें नाही. तेव्हां " हे महा- सचि, तू मसलें हे दुर्धर तप कां करितेस?" असेंही तिला न विचारिता "कायहो हे या अबलेचे विचित्र महातप" असे मनांतल्या मनात ह्मणत तो मारुत आकाशात उडाला. मेघमार्ग, विविध वातस्कध, सिद्धसघ व सूर्यमार्ग याचे उल्लघन करून विमानाच्याही वर गेल्यावर तो सदागति इद्रलोकास पोचला. तेव्हा महातपस्विनी जी सूची तिच्या पुण्यदर्शनाने स्वतः पावन झालेल्या वायूस इद्राने आलिंगन दिले व सूचीचा वृत्तात विचारला. त्यावर वायु ह्मणाला-देवेंद्रा, जंबू-द्वीपात हिमवान् या नावाचा एक अतिशय उच पर्वत आहे व साक्षात् शकर त्याचा जामाता आहे, हे तुला ठाऊक आहेच. त्या पर्वताच्या उत्तरशिखरावर सूची दारुण तप करीत आहे. तिचे तेज असह्य असून ती स्वप्रभावाने त्रिभुवनास भय- भीत करून सोडीत आहे. शीत वायूसही भक्षण करण्याचा प्रसग येऊ नये ह्मणून तिने आपले उदर सकुचित करून घेतलें आहे व त्याचे द्वार धुळीच्या एका कणाने बद करून ठेविले आहे. तिच्या तीव्र तपाच्या योगाने हिमालय उष्णालय झाला आहे व त्यामुळे तेथे आता यापुढे देवाचें व इतर सात्त्विक प्राण्याचे वास्तव्य होणे अशक्य झाले आहे. यास्तव हे देवा, आता आपण पितामहाकडे जाऊ या व तिला वर देण्याविषयी त्याची प्रार्थना करूं या; चल. कारण दुर्लक्ष्य केल्यास तिचें तें तप अनर्थावह होईल. वायूचे हे सत्य व हितकर वचन ऐकून देवांचा नायक देवांसह पितामहाकडे गेला व त्यास, सूचीस वर देण्याविषयी नम्रपणे सागून, त्याने आपलें मणणे मान्य केलें असतां, तो स्वपुरास परत आला. इकडे सात सहस्र वर्षे तप केल्यामुळे सूचीस दिव्य दृष्टि प्राप्त झाली. तिला तत्त्वज्ञान आपोआप झाले. तिला ब्रह्माचा साक्षात्कार झाला. राघवा,