पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्म ७४. ३७५ करण्यास समर्थ झाली नाही. तर नाचणारी स्त्री जशी आपल्या स्वाधीन असलेल्या हस्तपादादिकासच आपल्या इच्छेप्रमाणे नाचवू शकते त्याप्रमाणे ती सूचीही पापादि कर्माच्या योगानें पीडेस पात्र झालेल्या प्राण्यासच हवें तसे नाचवीत असे. ती वायुगतीच्या अधीन होती. ह्मणजे स्वतत्रपणे तिला कधी कोठेही जाता येत नव्हते. त्यामुळे ती बाहेरील व प्राणसंज्ञक आतील वायूच्या आधाराने दुर्बल होऊन रहात असे. मत्र, औषधि, तप दान, देवपूजा इत्यादिकाच्या योगाने तिला फार कष्ट होत. ह्मणून जेथे हे प्रकार होते तेथे ती क्षणभरही रहात नसे. दिवा विझविला की, त्याची प्रभा कोठे जाते हे जसे कळत नाही त्याप्रमाणे ती सूची पुण्यवानापासून कशी व केव्हा जाई ते कळत नसे. असो, आपल्या वासनेप्रमाणे राक्षसीस हे सूचीत्व प्राप्त झाले होते पण दशदिशेत व सर्व प्राणिशरीरात विहार करीत असूनही तिची तृप्ति झाली नाही. कारण अनेक शरीरातील सूक्ष्म क्रियाच्या योगाने तिची मानसिक तृप्ति मात्र होत होती. पण शारीरिक तृप्ति होईना. त्यामुळे तिला पूर्व शरीराचे स्मरण होऊन फार दुःख झाले व पुनः त्या विशाल शरीराच्या प्राप्तीकरिता तप करण्याचा तिने निश्चय केला. तपश्चर्येस योग्य प्रदेश कोणता, ते ठरवून आकाशांतून जाणाऱ्या एका तरुण गृध्राच्या हृदयात प्राणवायूबरोबर प्रवेश करून तिने त्यास इष्ट स्थळी जाण्याची प्रेरणा केली व त्याप्रमाणे त्याने तिला तेथे नेऊन सोडिले इद्रा, त्या पर्वत शिखरावर निर्जन प्रदेशात ती सूची आज अनेक वर्षे तप करीत आहे. आता तिच्या तपःप्रभावाने या त्रैलोक्याचा दाह होऊ नये ह्मणून तू तिला वर देण्याची काही योजना कर" राघवा, नारदाने असें सागितले असता इद्राने ती कोठे आहे, ते पहाण्याकरिता वायूस पाठविले. तेव्हा तो मरुत् ज्ञानरूपाने तिला शोधून काढण्याकरिता दश दिशेत फिरू लागला. अनेक लोक, अनेक भू-वलये व अनेक द्वी ओलांडून तो वायु जेथे ती उग्र तप करीत होती त्या हिमालय पर्वताच्या शिखरावर आला व तेथें तप करणान्या त्या विचित्र सूचीस पाहिल्यावर त्याच्या मनास समाधान वाटले ७३. सर्ग ७४.-त्या तापसी सूचीस पाहून वायु इंद्राकडे परत गेला; व इंद्राने तिला वर देण्याविषयी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली असें सागून या सर्गात सूचीच्या ज्ञानाचे वर्णन करितात.