पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७४ बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग ७३-इंद्राने प्रश्न केला असतां नारद जीवसूचीचा भोग व तप यांचे येथे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामा, कर्कटीचा तो अप्रिय वृत्तात ऐकून इद्राला मोठे कौतुक वाटले व तो नारदास ह्मणाला, " देवर्षे, त्या मूर्ख राक्षसीने घोर तप करून सूचीत्व प्राप्त करून घेतले. पण तिला स्यापासून कोणते वैभव भोगावयास सापडले" ते ऐकून नारद ह्मणाला, " देवेंद्रा, पिशाचभावास प्राप्त झालेल्या जीवसूचीने लोखडाच्या सुकुमार सूचीचा आश्रम केला. पण पुढे त्या लोहसूचीचाही आश्रय सोडून ती आकाशांतील वायु-रथावर आरूढ झाली प्राणवायूच्या मार्गाने ती देहात प्रविष्ट झाली व पक्षी जसा आपल्या घरट्यात लपून रहातो त्याप्रमाणे ती पाप्यांच्या शरीरांत आंतडी, शिरा इत्यादिकाच्या द्वारा शिरून दीर्घकाल गुप्तपणे लीन होऊन राहिली. ती जरी अति सूक्ष्म होती तरी तिचा प्रभाव फार मोठा होता. त्यामुळे नाडीमध्ये राहूनही ती प्राण्यास अतिशय पीडा देत असे. तिने अनेक प्राण्याच्या शरीरात प्रवेश करून त्या त्या शरीरास रचित असलेले भोज्य पदार्थ खाले व अनेक भोग भोगिले. तरुण स्त्रियांच्या रमणीय शरीरात प्रवेश करून तिने तारुण्याने अधिकच सुंदर दिसणाऱ्या विलासी पुरुषाचा उपभोग घेतला. त्याप्रमाणे तरुण पुरुषाच्या शरीरात शिरून तरुणींचाही भोग तिने यथेच्छ घेतला भ्रमरीच्या शरीरांत घुसून तिने नाना त-हेच्या पुष्परसाचा आस्वाद घेतला. गृध्रीच्या शरीरात जाऊन तिने प्रेताची शरीरें फाडून खाल्ली. कोठे सग्राम चालला असता त्यातील वीराच्या तरवारीच्या धारामध्ये शिरून तिने मनुष्याचे ताजे व ऊन रक्त प्राशन केलें पशूच्या शरीरात जाऊन तिने तृणादिकाची रुचि पाहिली. जलचराच्या देहात प्रवेश करून तिने विष्ठा-श्लेष्मा इत्यादिकाची चव घेतली. साराश याप्रमाणे प्रत्येक शरीरात जाऊन त्या त्या शरीराच्या द्वारा तिने खाणे, पिणे, निजणे, उठणे, बसणे, जाणे, येणे, खेळणे, देणे, देविवणे, नाचणे, गाणे इत्यादि सर्व केले. मनोरूप व वायुरूप अशा तिने या सृष्टीतील सर्व शरीरात सूक्ष्मपणे शिरून त्या त्या शरीराने घडणारी प्रत्येक क्रिया केली. साराश जे जे काही शरीरद्वारा होत होते तें तें सर्व तीच अदृश्य सूची करीत होती. पण वस्तुस्थिति अशी होती तरी निय- तीने नियमित झालेली ती सूची पूर्व मनोरथाप्रमाणे सर्व प्राण्याची हिंसा