पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-सगे ७२, 11- ३७३ huli-htani ke 17 शिखरावरच गेली. तेथे एकांत व उपसर्गशून्य स्थान पाहून ती घोर तप करू लागली. आपल्या सूक्ष्म पादतलाने पृथ्वीच्या रेणूस पीडा देणारी ती समोर किंवा इकडे तिकडे न पाहतां मोठ्या यत्नाने ऊर्ध्वमुख होऊन राहिली. ती काळ्या लोखंडाची असल्यामुळे व तोंडानें वायुभक्षण करीत असल्यामुळे त्या पर्वतावरील पाषाणमय प्रदेशी मोठ्या यत्नाने स्थिर राहू शकली. अरण्यांत मार्गाजवळच एकाद्या पानाच्या अग्रावर, तृण- जळु जशी जाणान्या येणाऱ्या लोकांच्या अंगास डांस मारण्याकरिता शेपटीवर उभी राहून टपून बसलेली असते तशी ती त्यावेळी भासत होती तिच्या नेत्यांतन पलीकडे पडलेलें ऊन व तिची छाया ह्या तिच्या रक्षक दासीच आहेत की काय, असे वाटे. राघवा, निग्रहावाचून कोणत्याही प्रकारची सिद्धि मिळत नाही दुर्जनांमध्ये कितीही जरी दुसरे दुर्गुण असले तरी निग्रह हा एक त्याच्यामध्ये मोठा गुण असतो. अकार्यच का होईना पण ते सुद्धा ते एकदा आरंभिल्यावर सोडीत नाहीत. या सूचीनेही आपलें इष्ट साधण्याकरिता झझावात, महावृष्टि, मेघगर्जना, विद्यत्पात, इत्यादिकास न भीता व त्यांचे असह्य उपसर्ग सहन करून घोर तप चालविलें. तिच्यावर मातीचे, पानाचे, गवताचे व वेलींचे थर बसले. पण ती निग्रही कर्कटी आपल्या निश्चयापासून ढळली नाही. तिने आपल्या चित्तास स्थिर केलें बाह्य स्पदापासून ती निवृत्त झाली व आतल्यात तिने आत्म्याचा विचार आरभिला. विचारात फार काल निघून गेल्यावर, तपाच्या योगाने पाप क्षीण झाले असता, तिला आत्मसा- क्षात्कार झाला. तिला तत्त्वज्ञान झाले चित्तकाम्य व निग्रह याचे हे फळ तिला तिच्या इच्छेवाचून मिळाले. असो; याप्रमाणे तिने त्या पर्वतावर सात सहस्र वर्षे घोर तप केले. त्यामुळे चवदा लोक सतप्त झाले. कल्पाती सृष्टीस जाळण्या करिता उत्पन्न झालेल्या अग्रीप्रमाणे भयकर असलेल्या तिच्या तापाने तो पर्वत पेट्रू लागला. त्यामुळे आता सर्व जग जळतें की काय, अशी सर्व प्राण्यांस भीति वाटली. इंद्रानें नारदास विचारले की, हा काय प्रकार आहे ? तेव्हा नारद ह्मणाला, " देवराजा, सूची आज सात सहस्र वष घोर तप करीत आहे. ती महा विज्ञानी झाली असून तिच्या तपःसामर्थ्याने हे जग अशा सकटात पडले आहे." ७२.