पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरण-सर्ग १९. ३५ मुटावयाचे असेल तर त्याला माझ्याप्रमाणेच शरीराची योग्यता व उपयोग ओळखला पाहिजे १८. सर्ग १९-अज्ञान, क्षुधा, तृषा, रोग, अशौच व चाचल्य यानों दृषित झालेले आणि तिर्यक्-जतू सारिखेंच असणारे बालपण कौमार कसे निद्य आहे ते येथे सागितले आहे. देह दुःखाचे मूळ आहे, असे जे मी आता सुचविलें, ते सर्वास पटणार नाहीसे वाटते. कारण प्राकृत जन प्रत्यही भोगाव्या लागणान्या नाना प्रकारच्या यातनास सुखच मानितात. मोठासा अनर्थ ओढवल्या- वाचून व " हाय, हाय" करण्याचा प्रसग येईपर्यत आपणास द न्व होत आहे, याचे त्यास भानच नसते. अभ्यासाने विषही गोड लागते व पचनी पडते. पण अतर्दृष्टि पुरुपास काय वाटते, व सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास कोणता अनुभव येतो, ते मला सागावयाचे आहे. जन्मापूर्वी देह अदृश्य असतो, तो कोणालाही प्रत्यक्ष दिसत नाही. त्यामुळे जन्माचे वेळी व गर्भाशयांत असताना प्राण्यास कोणत्या यातना भोगाव्या लागतात व त्याचा त्यास अनुभव येतो की नाही, हे गूढ आहे. म्हणून मी जन्मा- नतरच्या अवस्थेचेच अगोदर परीक्षण करितो. बाल्य ही जन्मानतरची पहिली अवस्था आहे. त्या अवस्थेत प्राण्यास दुःख होते की सुख ? मुख होते म्हणावे तर त्या अवस्थेत त्याच्या मुखावर प्रसन्नताच सतत असावयास पाहिजे होती, कारण सुखाचे मुख्य चिह्न प्रसन्नताच आहे. पण ती नसते. उलट त्याची मुद्रा घटिकेत सतरा वेळा बदलते. शिवाय असामर्थ्य, परतत्रता, तृष्णा, मुकेपणा, अविचार, इत्यादि दुःखाची सर्व निमित्ते त्या अवस्थेत सज्ज असतात एकाद्या लहान बालकाकडे पहात रहावे, म्हणजे त्याचा राग, लोभ, रडणे, दैन्य, इत्यादिकाचा अनु- भव येतो.. मला तर असे वाटते की मरण, जरा, रोग, संकट, तारुण्य इत्यादिकातील एकही अवस्था बाल्यातील दुःखाची व चिताची बरोबरी करू शकणार नाही. पशूची कृति व बालकाचे आचरण यात कांही अतर नसते. उजाडल्यापासून दिवस मावळेपर्यत व जागे झाल्यापासन निजेपर्यंत प्रत्यही लहान मुलास किती वेळा व किती निरनिराळ्या कार- णानी रडाये लागते, याचा काही नियम नाही. बाल्यावस्थेविषयी विचार करू लागले असता प्राण्यास पूर्वदुष्कर्माचे फळ भोगण्याकरिताच ईश्वराने