पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ७१. तशी माझ्या त्या तपाची स्थिति झाली विनाश काल आल्याकारणानेच मला ती दुर्बुद्धि सुचली, असे मी समजते. आता अगदी एकीकडे पड- लेल्या व अतिसूक्ष्म किड्याच्या शरीराहून सूक्ष्म असलेल्या माझा या दुः- खातून कोण उद्धार करणार ? स्थूलदृष्टि व्यवहारी तर धूळीत लोळणाऱ्या मला पाहूच शकणार नाहीत. बरे सूक्ष्म दृष्टि योगी माझा उद्धार करतील झणून ह्मणावे तर त्याच्या एकाग्रचित्तात माझ्यासारख्या दुर्भाग्यास थारा कोठून मिळणार ? एव च पर्वतावर राहणारास ग्रामातील तृण दिसणे जसे असभवनीय त्याप्रमाणे त्याचे चित्त मजकडे वळणे असभवनीय आहे. बरें, मीच आपला उद्धार करावा तर अशा या हीन व दीन अवस्थेत पडलेल्या माझ्या हातून कोणता पुरुषार्थ होणार ? हर हर ! देवा, प्राण्याच्या सहाराने व आपल्या मस्तकादि अगाच्या आधाराने अतरिक्षाचा भार उतरणारी मी केव्हा होईन ? माझ्या काळ्या कुट्ट लाब उदरास पाहून मेघाच्या भ्रातीने मयूर नाचू लागले आहेत, असे या नेत्रानी पाह- ण्याचा सुदिन कधी उगवेल १ मोठ्या थोरल्या गुहेसारखे ते माझे पूर्व उदर मला केव्हा मिळेल माझी ती मेणचट व तीक्ष्ण नखें माझ्या नेत्रास पुनः कधी आनद देऊ लागतील ? माझे हळु हसणेही मोठमोठ्या राक्षसाची हृदये भयाने कधी विदीर्ण करील १ भयकर अरण्यात मी आपले दुगण बडवीत मोठ्या आनदानें केव्हा नाचू लागेन ? वसारूपी आस- गाच्या घागरींनी व मेलेल्या चतुर्विध प्राण्याच्या-मास, अस्थि-इत्यादिकानी मी आपल्या या पोटाची पूर्ति एकसारखी कधी करू लागेन ? मोठमोठ्या पाण्याच्या शरीरातून चळचळ वाहणारे व कारज्याप्रमाणे उडणारे रक्त गटागट पिऊन मी मत्त होऊन केव्हा निद्रा घेऊ लागेन ? अरे दुर्दैवा. मीच त्या दुष्ट तपोरूपी अग्नीत आपल्या शरीराचा होम केला. तें माझें धप्पाड शरीर कोठे व हे क्षुद्र सूचीत्व कोठे 2 माझ्या त्या स्थूल शरीराने मी पृथ्वीवरून चालत असताना एका पर्वत शिखरावरून दुसन्या पर्वत- शेखरावर, असे पाय ठेवीत झराझर चालत असे. पण आता मला दुसन्याच्या सहायावाचून काही करिता येत नाही, अरेरे, परतत्रता कार कष्ट देते. सर्वस्वी दुसन्याच्या अधीन रहाण्यापेक्षां सहसा मरून जाणेही बरें? दुसरे वागवितील त्याप्रमाणे वागणान्या मला सुख कोठून होणार ? माझी सर्व प्रवृत्ति इतरावर अवलंबून राहिल्यामुळे मला