पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७० बृहद्योगवासिष्ठसार. करते, पण तृष्णारूपी सूक्ष्म व अदृश्य सूची पतकरत नाही. कारण बाणाचे अग्र औषधोपचाराने काढून टाकून हृदय पुनः पूर्ववत् करितां येते. पण तृष्णासूचीने विद्ध हृदय असाध्य होते. सर्वांची पूर्ति होते पण तृष्णेची पूर्ति होत नाही. असो; ती निशाचारी तृप्त न झाल्यामुळे मनात विचार करू लागली की, अरेरे मी मूर्खपणाने काय करून घेतले हे ? मी सूची का झाल्ये ? सूक्ष्म झाल्याकारणाने माझ्या सर्व शक्ती क्षीण झाल्या आहेत. त्यामुळे माझ्या उदरात एक ग्रासही मावत नाही. मग सर्व जबूद्वीपातील प्राणी कसे मावणार ? माझे ते विशाल व काळे भार शरीर कोठे आहे ? या माझ्या सूक्ष्म शरीराने मला काहीच कारता येत नाही, मासरसाचे घोट घेता येत नाहीत. एके ठिकाणी रहाता येत नाही, क्षुद्र व अपमानास्पद अवस्थेत रहावे लागते. हाय हाय कोणही माझी दुर्दशा । मी आपल्याच अविचाराने पहा कशी अनाथ झाले आहे ! मला एक क्षणभर सुद्धा एके ठिकाणी रहाता येत नाही. वाऱ्याबरोबर कोणीकडच्या कोणीकडे जावे लागते. मी आता निराधार झाले आहे. अति असह्य दुःखात व भयकर सकटात मी पडले आहे. मला सखी नाही, दासी नाही, माता नाही, पिता नाहीं; बधु नाही, पुत्र नाही; देह नाही व नियत स्थान नाही. वनातील शुष्क पर्णाप्रमाणे मी भ्रमण करीत राहिले आहे. या भय- कर आपत्तीतून माझी सुटका कशी होईल ? मला मरण आले असते तरी बरे होत, पण तेही येत नाही. काचेच्या मण्यास भुलून आपल्या हातातील चितामार्ण जसा एकाद्या अभाग्याने टाकावा त्याप्रमाणे मी या सूक्ष्म सूचीभा- वास भुलून आपला पुष्ट व विशाल देह व्यर्थ टाकिला. मोहित (मूद ) झालेले मन प्राण्यास अगोदर आपत्तीत ढकलते. नतर त्याच्यावर अनेक अन- थोंचे आघात करिते. सूची झाल्याकारणाने व्यावहारिक सूयीप्रमाणेच मला धुरात रहावे लागते, मार्गात पडून रहाण्याचा प्रसंग येतो व कुशल लोक मला गवताच्या काडीत घालतात. मी नेहमी दुसन्याची चाकर झाले आहे. सय जशी दोन्याच्या सचारास कारण होते त्याप्रमाणे मी दुसऱ्यांच्या चारास कारण होते. अरेरे, कोण हे दैन्य! मी परतत्र झाले. रत्नासारखा तुच्छ पदार्थही मला खावयास मिळत नाही. कारण मला पोट, कोठे आहे ? माझा सर्वस्वी नाश झाला. आता मी काय करूं? शातक/ कर्म करीत असताना त्यातूनच जसा वेताळाचा उद्भव व्हावा