पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७१. २६९ भूमीवर पडले व काही कालाने त्याचे भौतिक भाग भूतांत मिळून गेले. इकडे ती द्विविध सूक्ष्म सूचिरूप राक्षसी वाऱ्याबरोबर प्राण्यांच्या शरीरांत प्रवेश करून त्यांस पीडा देऊ लागली. रोगानी क्षीण झालेल्या लोकांस, दुर्बल प्राण्यांस, व वायूनें स्थूल झालेल्या निरुद्योग्यांस तर तिने फारच त्रास दिला. प्राणी " हाय हाय" करून तळमळू लागले की, हिला मोठे समाधान वाटत असे. पुष्कळ वेळां हिला यश मिळत असे, हे जरी खरे आहे तरी कोठे कोठे पूर्वोक्त मत्र, सदाचरण, परमात्मभजन, अध्ययन, इत्यादिकांच्या योगाने तिला पराभूत होऊन परतावेही लागे. रामा, त्या दुष्ट सूचीभूत राक्षसीच्या व्यवहारांचे फार वर्णन करीत बस- ण्यात काही अर्थ नाही. थोडक्यात मी आता इतकेंच सांगतो की, ती षया त्रिभुवनातील सर्व क्षुद्र, अमगल, दोषी व पापी वस्तूंमध्ये राहून व्यवहारांतील सूयीप्रमाणेच सर्वत्र सचार करीत राहिली. तिला अगम्य असे काही नसन अकार्य असेंही कांही नव्हते. ती दुःखशक्ति होती. सर्व क्लेश ही तिचीच अपत्ये होत. तिला प्राण्याच्या हृदयासारख्या भति' सूक्ष्म स्थानीही सहज प्रवेश करितो व रहातां येत असे. __ श्रीवाल्मीकि-मुनि वसिष्ठ इतकें सागत आहेत तो सायंकाळ झाला. त्याबरोबर सभेतील सर्व लोक सध्यावदनादिकांकरितां व रात्रौ परमात्म- चिंतनानंतर सुषुप्तीतील आत्मानद भोगण्याकरितां आपापल्या गृही गेले व दुसऱ्या दिवशी योग्य वेळी सर्व नित्य कर्मे आटोपून पुढचा रमणीय उपदेश ऐकण्याकरितां ते सभेतील आपापल्या स्थानी विराजमान झाले. इति षष्ठं दिनं. ७०. सर्ग ७१-या सर्गात कर्कटीला पूर्व देहाचे स्मरण होऊन मोठा पश्चात्ताप झाल्यामुळे तिनें शोक कसा केला, याचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-दशरथतनया, काल सांगितल्याप्रमाणे ती राक्षसी दीर्घ- काल प्राण्यांस पीडा देत राहिली. पण तिची सर्व प्राण्यांस खाऊन त्यांच्या मांसाने तृप्त होण्याची इच्छा पूर्ण होण्याचे काहींच चिह्न तिला दिसेना. प्रत्येक प्राण्याच्या हृदयांत प्रवेश करून ती त्यांच्या शरीरातील रक्तमासादि धातूंस शोषून टाकीत असे, हे खरे. पण तेवढ्या मांसास्वादानें तिची तृप्ति होणे शक्य नव्हते. झणूनच ह्मणत असतात की, हृदयांत तीक्ष्ण माणाचे शल्य शिखन, त्याच्या योगानें तें विदीर्ण झाले तरी पत-