पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६८ बृहद्योगवासिष्ठसार. लेली ) होती. ती आकाशरूप व निराकार असून तिचे सूक्ष्मशरीर आकाशाप्रमाणे सूक्ष्मस्वभाव होतें. तेजाच्या सूक्ष्म प्रवाहाप्रमाणे तिची कांति होती. ती प्राणतुतुमय होती. कुंडलिनीशक्ति हाच तिचा आकार आहे, एवढेच फार तर तिच्या आकाराविषयी अधिक सांगता येणे शक्य होते. सूर्य व चंद्र याच्या सूक्ष्म किरणांप्रमाणे ती सुदर होती. सारांश त्या कर्कटीची पापा- मिका व त्यामुळेच तरवारीच्या धारेसारखी अतिक्रूर मनोवृत्ति प्रति लोखंडी सूचीप्रमाणे असून ती जीवरूपाने स्थित होती. पुष्पाच्या गधलेखेप्रमाणे असणारी ती, अतिसूक्ष्मरूपाने प्राण्याच्या शरीरात प्रवेश करून हिंसादि कलेंतील चातुर्याने प्रकट होऊन राहिली. (ह्मणजे प्राण्यांस पीडा दे. णाऱ्या ज्या हिंसादि कला त्यांत ती फार चतुर असून त्यांतील चातुर्य हेच तिचे प्रकटरूप होय.) दुसऱ्याच्या प्राणांस अनुसरून आपला मनोरथ सिद्ध करून घेण्यास ती उद्युक्त असे. असो; येणेप्रमाणे ती राक्षसी कृश झाली. ती दोन सूचीमय बनली. ती जोंधळा, गहु इत्यादि धान्य-कणाच्या अति सूक्ष्म अग्राप्रमाणे पातळ व कापसाच्या अति सूक्ष्म ततूप्रमाणे कोमल झाली. त्या द्विविध शरीराने प्राण्याच्या हृदयात प्रवेश करून त्यास वेध करणारी ती क्रूर राक्षसी चोहोकडे भ्रमण करू लागली. राघवा, संकल्पाचे ठायी अघटित प्रकार घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, याविषयी जर कोणास निदर्शन (दृष्टात ) पाहिजे असेल तर हे या राक्षसीचे निदर्शन चांगले आहे. प्रत्येक प्राणी सकल्पावशात् लघु किवा गुरु होतो. ज्यांचे मन क्षुद्र असते ते क्षुद्र फलाचीच कशी इच्छा करितात ते या राक्षसीन्या वृत्तातावरून चागले समजते. तिने इतके तीव्र तप केले व त्या- मळे तिचे शरीरही पवित्र झाले. पण तिची जातीच्या अनुरूप अस- लेली वासना नष्ट झाली नाही. सहस्र वर्षे घोर तप करून व असह्य केश सोसून तिने सिद्धि मिळविली खरी, पण तिचा उपयोग परपीडेंत केला. " पुण्य शरीराने जरी एकादा सपन्न झाला तरी त्याचा जातिस्वभाव जात नाही" ह्मणून जे ह्मणतात, ते खरे आहे. फार काय पण दुजेन आपली अतोनात हानि करून घेऊनही दुसन्यास दुःख देण्यास तयार होतात. या नियमास अनुसरूनच ती वाऱ्याबरोबर दश-दिशेत भटकू लागली असता तिचे ते स्थूल शरीर सुकलेल्या वृक्षाच्या पानाप्रमाणे