पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६६ बृहद्योगवासिष्ठसार. नतर वृक्षाच्या शाखे एवढा तिचा आकार झाला. पुढे ती पुरुष-प्रमाण मणजे साडे तीन हात झाली. काही कालाने तिचे शरीर हस्तप्रमाण झाले. पुढे ती टीचभर झाली. नंतर हाताच्या अगुळा-एवढा तिचा आकार झाला. बऱ्याच वेळाने ती उडदाच्या शेंगेसारखी झाली. त्यानंतर तिचे शरीर मोठ्याशा सूयीसारखें दिसू लागलें. होता होता ती रेशमी वस्त्रे शिवण्याच्या सूक्ष्म सूयीच्या आकाराची बनली व शेवटी तर पुष्पांतील सूक्ष्म ततूसा- रखा तिचा देह झाला. तात्पर्य तिचें तें भयंकर शरीर तिच्या संकल्पाच्या प्रभावाने सूक्ष्म झालें व येणेप्रमाणे ती सूक्ष्म लोखंडाच्या सुयीसारिखी होऊन शोभू लागली. आकाशात रहाणारी ती, पूर्वोक्त ( पृष्ट ) पुर्यष्टकाने चलनयुक्त होत्साती आकाशात गेली. ती सुयीसारखी दिसते खरी पण तिच्यामध्ये लोखंड असते, असे तू समजू नकोस. कारण तिचा तो सूच्या- कारही इतर दृश्याप्रमाणेच भ्रम-कल्पित आहे. सृष्टीत जे अनेक सविद्रम आहेत त्यातीलच तो एक भ्रम आहे. सूर्याचे किरण आत शिरले असता रत्नसूची ( रत्नाची मुयी ) जशी मुदर दिसावी त्याप्रमाणेच ती सुंदर दिसत असून शिवाय तिच्यामध्ये मननशक्ति हा एक दुसऱ्या कोठेही नसणारा विशेष होता. फार दुरून पाहिल्यास ती एका दिव्यासारखी दिसत असे. तिचे सूचीशरीर दिसत नाही ह्मणून त्यावेळी ती आकाशरूप झाली आहे, असे वाटे. पण तिचे हे सूक्ष्मरूप सर्वाना कधीच दिसत नसे. तर एकाग्र दृष्टीने पहाण्याचा ज्यानी दीर्घ काल अभ्यास केला असेल त्यासच तिचे ते चकचकित स्वरूप दिसत असे. नुकत्याच स्नान केलेल्या बाल- काच्या, वान्याने हलणाऱ्या कुरळ्या केसाप्रमाणे, ती चचल असून प्राण्याच्या हृदयांत अनेक विलास करीत असे. हृत्कमलनालातून वर निघून ब्रह्मरध्रातून बाहेर पडून ती सूर्यमंडलाकडे जाण्यास उद्यत आहेसे वाटे. इंद्रियादि नियमित स्थानी असलेल्या शक्ति त्या तिच्याच दासी अथवा अश होत. सूच्याकार झालेल्या लिंगदेहाने ती बाहेर स्थित होती. बौद्धांचे " अह" या आकाराचे विज्ञान ज्याचे त्यास समजत असले तरी ते जसें अन्यांस न समजण्यासारखे असते अथवा तार्किकांचे धारावाहिक (धारेप्रमाणे सतत वाहणारे ) ज्ञान, त्यास साक्षी आत्मा मान्य नसल्यामुळे, जसे दुसन्यांस न समजण्यासारखे असते त्याप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरात असणारी ती दुसन्या कोणास न समजण्यासारखी होती व ती विषूचि-