पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७०. ३६५ असें मणून पुनः तिला ह्मणाला, " तू विचिका या नांवाची उपसर्गयुक्त सूचिका होशील. आपल्या सूक्ष्म मायेनें तू सर्व लोकांची हिसा करशील, निषिद् भोजन करणारे, अपक अन भक्षण करणारे, मध्यरात्र, ग्रहणसमय इत्यादि अकाली भोजन करणारे व अशाचप्रकारचे जे दुसरेही अनेक दुर्भोजन करणारे असतील, त्याचप्रमाणे दुसऱ्याचे अनिष्ट करणारे, दुष्ट प्रदेशांत वास करणारे व अशास्त्रीय मार्गाने जाणारे जे असतील त्या दुष्टाच्या हृदयात प्राणवायूबरोबर प्रवेश करून हृदय कमल, प्लीहा, बस्ति, शिरा इत्यादिकांस पीडा देऊन त्याची तू हिंसा करशील. तूं वायूच्या सूक्ष्म लेखेप्रमाणे विचिका नामक व्याधि होऊन शास्त्रसदाचारनिष्ठ व उन्मार्गी अशा दोन्ही प्रकारच्या लोकास त्राहि त्राहि करून सोडशील. पण त्यातील सदाचारसपन्न लोकास तुझा प्रतीकार करिता यावा, ह्मणून मी हा “ ॐन्ही हा री रा०" इत्यादि मत्र उत्पन्न करून ठेविला आहे. (त्याचा भावार्थ असा. हे ही व्हा इत्यादि विष्णुशक्तिरूप देोवे, तुला नमस्कार असो. हे भगवति, आद्य विष्णुशक्ते, रोगात्मक अशा या आपल्या अशभूत दुसन्या विष्णुशक्तीचे निवारण कर. तिला स्वस्थानी ने. तिला पक्क तदुलाप्रमाणे मृदुकर. तिचे दह्याप्रमाणे विलोडन कर. तिला नाहीशी करून टाक अथवा कोठे तरी दूर नेऊन सोड इत्यादि. भगवानाची दोन प्रकारची शक्ति आहे. त्यातील पहिली माया व दुसरी तिच्या अधीन असलेली अपरा. तिच्यामध्ये सर्व शक्तींचा अतर्भाव होतो. सात्त्विक, राजस व तामस अशाप्रकारचे तिचे अनेक भेद होत असतात. तामसी अपरा शक्ति हीच सहार-शक्ति असून प्राण्याच्या दुष्कर्मोपासून फल- रूपानें परिणत होणारे रोग हे तिचेच अश होत व त्यांचे निवारण करण्याकरिता आद्यशक्तीची प्रार्थना या मत्रात केली आहे. ) असो: याप्रमाणे सज्जनावर उपकार करण्याकरिता विचिका-निवारक मत्र व त्याचें शौच, समाधान इत्यादिकासह करावयाचे सर्व विधान सागून तो देवाधिदेव स्वस्थानी गेला ६९. सर्ग-७० ती राक्षसी क्रमान सूक्ष्म होता होता द्विविध सूचीरूप झाली व त्यां- ___तील एकीने प्राण्याच्या शरीरात प्रवेश केला, असें वर्णन कारेतात. श्रीवसिष्ठ--राघवा, त्यानतर पर्वताच्या शृंगासारखी असलेली ती विकराल व कृष्णवर्ण राक्षसी सूक्ष्म होऊ लागली. प्रथम ती अभ्रासारखी झाली.