पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६५ बृहद्योगवासिष्ठसार. राजाच्या शिखरावर जाऊन बसलेली ती एकाद्या काळ्याकुट्ट मेघासारखीच दुरून पाहणारास दिसत असे. तेथे गेल्यावर स्नान करून ती विक्राळ राक्षसी एका पायावर उभी राहिली. पूर्णिमेचा चद्र व सूर्य यांप्रमाणे तिचे नेत्र कधीं मिटत नसत. याप्रमाणे निश्चयाने ती तेथे उभी राहिली असता क्रमाने तिचे दिवस, पक्ष, मास, ऋतु, अयनें, व वर्षे जाऊ लागली. शीत, उष्ण इत्यादि सहन करीत स्थिर होऊन राहिलेली ती स्या पर्वताच्या शिखराचाच एक भाग आहे, असे वाटे. असो; शेवटी याप्रमाणे दीर्घकाल एकनिष्ठेनें तप करणान्या तिच्यावर अनुग्रह करण्या- कारता कमलोद्भव ब्रह्मा तेथे आला ६८. सर्ग ६९-या सर्गात, ब्रह्मदेव तिला इष्ट वर व गुणी पुरुषाचे रक्षण व्हावें ह्मणून एक मंत्र देऊन स्वलोकी गेला, असें वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, सहस्रवर्षे तप केल्यावर अनुग्रहास पात्र झालेल्या व स्वप्रयत्नाने अनुग्रह करण्यास भाग पाडणाऱ्या तिच्या जवळ ब्रह्मदेव भाला. कारण तप हवी ती सिद्धि देऊ शकते व तपसिद्धि झाली असता विषासह अग्निही शीतल होतो. असो, तेव्हा मनानेच त्यास प्रणाम करून ती तशीच स्थिर राहिली. आता यान्याजवळ क्षुधाशात्यथे कोणता वर मागावा, ह्मणून ती मनात विचार करू लागली. विचाराती काय मागा- वयाचे ते तिला आठवले. मी रोगयुक्त लोखडी जीवसूचिका (सुई) होते. या ब्रह्मदेवान्या वराने मी दोन प्रकारची सूची झाले झणजे कोणास न दिसता एकाद्या सुगधाप्रमाणे मला सर्व प्राण्यांच्या हृदयांत प्रवेश करिता येईल व या उपायाने माझ्या इच्छेप्रमाणे मला सर्व जग पासता येईल आणि माझी क्षुधा शात होईल. कारण क्षुधाशातीहून अधिक सुख कोणतेही नाही. असा मनातल्यामनात विचार करीत असलेल्या तिला, तिचा दुष्ट अभिप्राय जाणूनच, ब्रह्मदेव ह्मणाला, " राक्षसाच्या कुलाचे भूषण होणारे पुत्रि कर्कटिके, या घोर तपाचा त्याग कर. मी तुझ्या या आश्चर्यकारक तपाने सतुष्ट झालो आहे. तुला जो वर पाहिजे असेल तो मागून घे." राघवा, हे ऐकून ती निशाचरी ह्मणते, " भगवन्, हे भूत- भव्येश ( मागे झालेल्या, पुढे होणाऱ्या व वर्तमानकाली असणाऱ्या वस्तुमात्राच्या नियामक ), तुला जर वर द्यावयाचाच असेल तर मी रोगयुक्त सूची जीवसूचिका व्हावे हा वर दे." तेव्हां ब्रह्मदेव 'तथास्तु'