पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६८. सर्ग ६८-या सर्गात करंटीनामक राक्षसीचे सर्व भूतास वायाच्या इच्छेने तिने केलेल्या उप्र तपाचे वर्णन करितात. श्रीवासिष्ठ-रामा, याविषयीं एक पुरातन इतिहास सांगत असतात. त्यात एका राक्षसीनें तत्त्वार्थाने भरलेले अनेक प्रश्न केले आहेत. हिमालयाच्या उत्तरेस एक ककेटीनामक राक्षसी रहात असे. तिला विषूचिका व अन्यायबाधिका अशी आणखी दोन नावें होती. तिचा वर्ण काजळासारखा होता. गीष्मर्तृत सुकलेल्या विध्य-अरण्याप्रमाणे ती शुष्क व कृश झाली होती. तिचे उदर अंतरिक्षाच्या उदराप्रमाणे अतिशय विस्तीर्ण होते. तिचे नेत्र अग्नीच्या निखान्यासारखे लाल होते. ती काळे वस्त्र नेशीत असे. तिचे केस नेहमी वर उच उभारलेले असत. तिचे गुडघे तमालवृक्षासारखे कठिण होते. तिची नखें लालवर्णाची व सुपाच्या आकाराची होती. ती आपल्या गळ्यात मनुष्याच्या शुष्क भस्थिपंजराच्या माळा घालीत असे. एकादा शिवभक्त बाहु, कठ, इत्यादि स्थळी रुद्राक्ष जसे धारण करितो त्याप्रमाणे ती सवे शरीरावर शवांच्या माळा धारण करीत असे, सुकलेल्या कपालास्थींची कुंडले ती आपल्या कानात घालीत भसे व ती एकसारखी लडलडा हालत असत. तिचे हातही फारच लांब होते. पण तिचे शरीर फारच मोठे असल्यामुळे व जठराग्निही अतिशय प्रज्वलित असल्याकारणाने तिला अन्न मिळेना आणि त्यामुळे तिची तृप्ति होईना. वडवाग्नीच्या ज्वालेप्रमाणे त्या महोदरीची जेव्हा तृप्ति होई- नाशी झाली तेव्हा तिने मनांत असा विचार केला--समुद्र जसा नद्यांतून येणान्या जलास एकसारखा आपल्या उदरात साठवीत असतो त्याप्रमाणे या जबुद्वीपांतील सर्व प्राण्यांस जर मी प्रत्येक श्वासाबरोबर गिळून टाक- ण्यास समर्थ झाले तरच माझी तृप्ति होईल. पण त्याला कोणती युक्ति योजावी ? कारण आपत्कालीही ज्या युक्तीने प्राण वांचतील तीच युक्ति उत्तम होय. पण मत्र, औषधि, तप, दान, देवपूजा इत्यादि उपायांनी सुरक्षित झालेल्या सर्व प्राण्यास एकदम खातां येणे शक्य नाही. यास्तव, मी आतां न कंटाळतां व खिन्न न होतां घोर तप करिते. कारण अति उग्र तपाने दुर्लभ वस्तूंचाहा लाभ होतो, असा पुष्कळांस अनुभव भाला आहे. असा विचार करून यावत् प्राणिमात्रांस खाऊन टाकण्याच्या इच्छेने ती इतर भतांस दर्गम असलेल्या हिमालयावर गेली. त्या पर्वत.