पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६२ बृहद्योगवासिष्ठसार. रूप माहे. यास्तव वस्तुतः काही उत्पन होत नाही व काही नष्ट होत नाही. सृष्टि अशा अशा क्रमाने उत्पन्न होते, असें जे शास्त्रांत सांगितलेले असते तेंही प्रपंचमिथ्या आहे हे समजून देण्याकरितांच होय. ब्रह्मदेवादि जीवाची सत्ता जशी सदसन्मयी (सणजे विचाराध्या कसोटीस न उत- रणारी ) असते तशीच ती देवापासून कीडमंगीपर्यंत सदसन्मयीच असते. अर्थात् जीवत्वही जगत्कोटींतच येते. त्यामुळे तेंही मिथ्या आहे. ब्रह्मदेवापासून कीटापर्यंत प्रसिद्ध असलेले ज्ञान ( सवेदन, सुखदुःखादि- जाणीव ) जरी अनुभवापासून उत्पन्न झालेले असले तरी ब्रह्मज्ञानाने या सर्वाचा बाध होतो. जसा ब्रह्मदेव निर्माण होतो तसाच कीटही निर्माण होतो. ब्रह्मदेवाचें चित्त मलिनतेने मुळिच आच्छादित झालेले नसते. झणून तो जगत्कर्ता होतो व कीटाचे चित्त चित्तदोषानी अतिशय मलिन झालेले असते ह्मणून तो क्षुद्रकमें करणारा होतो. रणजे कोणत्याही जीवाच्या जाणिवेत भेद नाही. पण त्याची जीवता उपाधीच्या अनुरोधानें रहाणारी असल्यामुळे तिच्या पौरुषात (कर्मात व शक्तीत ) अतर असते. पुण्यकर्माच्या अत्यंत उत्कर्षामुळे ब्रह्मता प्राप्त होते व पापाच्या आधिक्यामुळे जीवास कीटता प्राप्त होते. ते दोन्ही भाव हे सर्व चिन्मात्र आहे असे न जाणल्यामुळे येतात. पण तसे एकदा ज्ञान झाले की, अशाप्रकारच्या सर्व भ्राति क्षीण होतात. कारण प्रमाता, प्रमाण, प्रमेय इत्यादि सर्व चिन्मात्र ब्रह्मतत्त्वाइन भिन्न नाही. त्यामुळे सर्व, द्वैतवाद व अद्वैतवाद मिथ्या आहेत. ते केवल भावनेच्या दृढतेमुळे भासत असतात. आपण जशी भावना करावी तसा आपणास अनुभव येतो. जे पृथ्वी, आप, इत्यादि भूतांच्या विकारांनी भरलेल्या जगाची भावना दृढ करितात त्यांस जगाचा अनुभव येतो. तेंच सत्य आहे, असे वाटते व जे त्रिपु- टींचा क्षय करून ब्रह्ममय होतात. ब्रह्माची भावना दृढ करितात ते ब्रलमय होतात, असा नियम आहे. हा सर्व स्वभावाचा विलास आहे. ब्रह्म- देवे मनानें प्राण्याच्या कर्माप्रमाणे जे जे जसे व्हावें झणून कल्पना कारतो ते तें तसेच होते. हा स्वभावसंज्ञक नियतीचा धर्म आहे. साराश जग मनःकल्पित आहे. ह्मणून ते असत्य आहे व चेतन मनोरथमात्र नसून स्वाभाविक स्वसत्तेने युक्त आहे. ह्मणूनच ते सत्य माहे ६७.