पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ बृहद्योगवासिष्ठसार. बोलून दाखविण्यास कचरतो; व ज्याच्या योगानेच कृतकर्मची चागली किंवा वाईट फळे अनुभवावी लागतात त्या देहाची तात्त्विक अवस्था काय आहे ? याचा जर विचार करू लागले तर आश्चर्य वाटते. कारण वरून मुदर दिसणाऱ्या या शरीरांत काय आहे ? व आपण त्याच्याविषयी सामा- न्यतः काय समजतों ? याचा विचार आश्चर्य-उत्पादकच आहे. आतडी, नाड्या, हाडे, रक्त, मास, विष्ठा, मूत्र, कफ, लाळ, शेबूड, डोळ्यातील अश्रु व पू, कानातील मळ, घाम इत्यादि पदार्थानी भरलेल्या या शरीराप खुळा प्राणी किती पवित्र मानतो, याचा काही सुमार तरी आहे का ? हा जड गोळा प्राण्यास आपल्या आत्म्याहून, आपल्या स्वाभाविक स्वतत्र- तेहून व आपल्या स्वरूपानदाहूनही शतपट किवा सहस्रपट अथवा अनतपट प्रिय वाटावा व त्याच्या करिता त्यानीं काय पाहिजे ते पाप करण्यास तयार व्हावे यापेक्षा आणखी अधिक चमत्काराचे उदाहरण कोठे मिळणार ? सामान्य जनसमूहास हा कल्याणकर आहे की अकल्याणकर आहे ? नित्य आहे की अवश्य नाश पावणारा आहे ? जड आहे की चेतन आहे ? सुखाचे निमित्त आहे की दुःखाचे मूळ आहे ? हे जरी न समजले तरी विचारी ह्मणविणाऱ्या व ज्ञानी ह्मणून मिरविणान्या आमन्या सारिख्या श्रेष्ठास का समजू नये? हा जरी जड असला तरी आत्म्याच्या कृपेने सचेतन झाला आहे, जरी वस्तुत. मलिन असला तरी आत्मसत्तेमुळे तो अतिशुद्ध झाला आहे व आत्मोन्नति करून घेतल्यास न्याची शुद्धि याहूनही अधिक वाढेल, तो मोक्षास कारण होईल, असे ममजल्यास व त्याप्रमाणे त्याचा उपयोग केल्यास, या अमगलापासूनही केवढे मगल होणार आहे ? पण अज्ञ पुरुष अशा दृष्टीने त्याच्याकडे पहात नाहीत, आणि त्यामुळेच त्याची निदा करावी तितकी थोडीच वाटते. ते मूर्ख या देहासच आत्मा समजतात. पण तो तर क्षणात तृप्त व क्षणात अतृप्त होणारा आहे, गुणशून्य व दोपपूर्ण आहे, उत्पन्न होऊन नाश पावणारा आहे, स्वभावतःच दुःखदायी मनाचा हस्तक आहे; अहकागचे घर आहे, रोगाचे क्षेत्र आहे व सर्वतोपरी अनथेकर आहे. तेव्हा, मुनिराज, मी या दुष्टाच्या नादी कसे लागावे ? त्याला तुच्छ मानिल्यावाचून माझे कल्याण कसे होईल ? या वाइटापासूनही जर को- णास आपल हित साधून घ्यावयाचे असेल व या ससारातील यातनांतून